Strike Sakal media
मुंबई

गिरणी कामगारांचा मोर्चा धडकणार म्हाडा कार्यालयात ; संघटना आक्रमक

तेजस वाघमारे

मुंबई : गिरणी कामगारांच्या (Mill workers) विविध मागण्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे (mva government) लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेमार्फत 15 नोव्हेंबरला (सोमवारी ) म्हाडा (mhada office) कार्यालयावर मोर्चा (strike) काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चानंतरही सरकारने कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने (strike warning) दिला आहे.

बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा अध्यादेश सरकारने 2001 मध्ये काढला. त्यानंतर गिरणी कामगारांची माहिती संकलीत केले. त्यानुसार म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये 15 ते 16 हजार गिरणी कामगारांना घरे देण्यात आली आहेत. सर्व कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी जमीन अपुरी पडत असल्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रातील जमीन देण्याचे सरकारने ठरविले. त्यानुसार ठाणे जिल्हयातील ठाणे, अंबरनाथ व कल्याण तसेच रायगड जिल्हयातील पनवेल येथील जमिनीची पाहणी केली. या जमिनी गिरणी कामगारांच्या घरांसाठी योग्य असल्याचे मुख्य सचिवांना कळविले.

त्यास आता 5 वर्षे होऊनही या जमिनीबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही. तसेच पनवेल येथील एमएमआरडीएने बांधलेल्या घरांची सोडत होऊन कामगारांनी पैसे भरले तरी त्यांना अद्याप ताबा मिळालेला नाही. अजूनही 1 लाख 75 हजार गिरणी कामगारांपैकी सुमारे 1 लाख 60 हजार गिरणी कामगारांना घरे मिळणे बाकी आहेत. सरकारने ठाणे, अंबरनाथ, कल्याण व पनवेल येथील 90 एकर जमीन शासनाने म्हाडाकडे हस्तांतरीत केली असती, तर 70 ते 80 हजार गिरणी कामगारांना घरे मिळाली असती. पण सरकार स्तरावर याबाबतचा निर्णय होत नसल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत. कामगारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखेर म्हाडा कार्यलयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT