Aditya Thackeray  sakal media
मुंबई

कोरोना लसीकरणाबाबत ठाकरेंच्या महापालिकेला सूचना, म्हणाले...

- समीर सुर्वे

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (Corona) धोका लक्षात घेता बिगर शासकीय संस्थांमार्फत (Non Government organization) तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लस साठा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. तसेच लशींची उपलब्धता (Corona Vaccination) वाढवून लसीकरण अधिक गतीमान करावे अशी सुचना आज उपनगरचे पालकंमत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महानगरपालिका (BMC) प्रशासनाला केली. ( Minister Aditya Thackeray gives instructions to BMC on Corona Vaccination-nss91)

महापालिका मुख्यालयात आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील लसीकरण, विकास कामे तसेच पुरपरीस्थीतीबाबत बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह सर्व अतिरीक्त आयुक्त उपस्थीत होते.अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यावेळी लसीकरणाबाबत माहिती दिली. संपुर्ण लसीकरणा बरोबरच ऑगस्ट महिन्या पासून सुरु होणारे डोअर टू डोअर लसीकरण, असंघटीत कामागाराचे लसीकरण तसेच झोपडपट्ट्यांमधील लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला. नागरीकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेतलेला नाही त्यांचे लसीकरण करुन घ्यावे तसेच दोन्ही डोस झालेले जोखीमग्रस्त व्यक्तींकडे लक्ष ठेवावे अशी सूचनाही त्यांनी केली.

खड्डे दुरुस्त करा

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. नागरीकांनी त्यांच्या विभागातील खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर त्यावर तत्काळ उपाय करण्यात यावे. तसेच, बदलते पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पर्जन्यवाहीन्यांची यंत्रणा,पंपिंग स्टेशन अधिक सक्षम करण्या बरोबर होल्डिंग पॉड्सची संख्या वाढविण्याचाही विचार करण्याची सूचना त्यांनी केली.

महानगरपालिका वर्सोवा पासून मढ बेटापर्यंत वाहतूक पूल बांधणार आहे. या कामात काही अडचणी आहे. या अडचणींचा आढावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी घेतला. ठाकरे यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डयांबाबतही आढावा घेतला. तसेच खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली. नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन ते बुजवण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान शहरात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अमलात आणलेल्या उपायोजनांचाही त्यांनी आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT