bacchu kadu Sakal media
मुंबई

नेरुळच्या एपीजेय शाळेवर उगारणार कारवाईचा बडगा, राज्यमंत्र्यांचे आदेश

संजीव भागवत

मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ (nerul) येथे असलेल्या एपीजेय (Apeejay school) या खाजगी शाळेने डोनेशन प्रतिबंध कायद्याला (School fees act) पायदळी तुडवत डोनेशन घेतल्याने या शाळेच्या प्राचार्य आणि संस्थाचालकांवर (School authorities) डोनेशन प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होणार. यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांनी या शाळेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ( minister bacchu kadu on action against nerul apeejay school for fees matter-nss91)

नेरूळ येथील एपीजेय स्कूल प्राचार्य व संस्था चालक यांनी पालकाकडून शाळा प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली 1 लाख 22 हजार 201 रुपयांचा डीडी व 6 हजार 457 रुपये हे ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे होती. त्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात असलेल्या डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार कोणत्याही शाळा आणि संस्थांना शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र नेरूळ येथील या शाळेने या कायद्याला न जुमानता पालकांकडून डोनेशन घेतले असल्याची तक्रार पालक अजय तापकीर यांनी केली होती. त्यात त्यांनी तापकीर यांची मुलगी कथा तापकीर याच्या शाळा प्रवेश वेळी दिलेली डीडी व ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून आपल्या तक्रारीत जोडला होता.

तसेच संबधित शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करून पालकांचे पैसे परत देण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अड. मनोज टेकाडे यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या शाळे वर गुन्हा दाखल करण्याची आदेश दिले आहेत. यामुळे या शाळेतील प्राचार्य आणि संस्थाचालक यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती तापकीर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT