धारावी : राज्यातील मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबरोबरच त्यांना पालकत्व देण्यात आलेल्या जिल्ह्याचा आढावा घेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. राज्यात असलेल्या टाळेबंदीमुळे उपहारगृह आणि दुकाने बंद असल्याने मंत्र्यांना आपल्या दौ-यात घरातूनच भाकरी बांधून घ्यावी लागत आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या शिक्षणमंत्री यांना शिक्षण विभागाकडे लक्ष देत असतानाच त्यांच्या धारावी या कोरोनाने थैमान घातलेल्या मतदार संघाकडेही लक्ष द्यावे लागत आहे. धारावीमध्ये दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. धारावीमध्ये उपाययोजना करण्यासोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध महत्वाचे निर्णय घेण्यासाठी गायकवाड यांना धावपळ करावी लागत आहे.
वर्षा गायकवाड या हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने विविध बैठकांना हजेरी लावण्यासाठी त्यांना मुंबई ते हिंगोली असा रस्ते मार्गे प्रवास करावा लागत आहे. टाळेबंदीमुळे उपहारगृहे बंद असल्याने असा प्रवास करताना त्यांना दोन वेळेचे जेवण बरोबर घेवूनच प्रवास करावा लागत आहे. परवा हिंगोलीचा दौरा करून मुंबईला परतीचा प्रवास करत असताना त्यांनी थेट शेताच्या बांधावर आपल्या सोबत आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला.
मंत्रीपदाचा कसलाही बडेजाव न करता आलेल्या संकटाशी सामना करणाऱ्या आणि त्यांच्यातील साधेपणाचे कौतुक समाज माध्यमातून होताना दिसत आहे.
Minister of Education take a meal on the farm, appreciating the simplicity
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.