Minister Ramdas Athawale
Minister Ramdas Athawale  sakal
मुंबई

Dombivli : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची, केंद्रीय मंत्री रामदास आठवले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश मेजॉरिटी असून मोठी कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत आज आहे. शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दरवर्षी मेळावा होता. त्यानुसार यंदा मुंबई महानगरपालिकेने शिंदे यांच्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची त्याठिकाणी परवानगी द्यावी.

उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कोठेही दसरा मेळावा घेण्यास हरकत नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच मेळावा झाला पाहीजे, यासाठी पालिकेने त्यांना परवानगी द्यावी असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे व्यक्त केले.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खासगी कामानिमित्त केंद्रीय मंत्री आठवले हे सोमवारी आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना दसरा मेळाव्या विषयी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. एकनाथ शिंदे यांची बाजू घेत त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून शिवाजी पार्क येथे खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा झाला पाहीजे, त्यासाठी पालिकेने त्यांना परवानगी द्यावे असे वाटत असल्याचे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे हे पूर्वी रिक्षाचालक होते. परंतू आता ते राज्य चालवित आहेत, त्यामुळे रिक्षाचालक बोलून मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे योग्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना मिळालेले आहे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एखादी जागा बघून मेळावा घ्यावा. मेळावा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. आमचा मेळावा हा नागपूर मध्ये होते. मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मेळावा घेण्याची तर हरकत नाही असा मेळावा घेण्यास. बघूच आपण कोणाचा मेळावा मोठा होतो ते असे बोलून आठवले यांनी मनसेचे राज यांना एक प्रकारे आव्हान दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट घेतली होती. राज यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांची भेट घेतली त्यात वेगळे काही नाही. निवडणुकांमध्ये विचार केला तर मनसेला मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. आरपीआय पक्ष हा भाजपा सोबत आहे, एकनाथ शिंदे गट भाजपा सोबत आहेत. भाजपा आणि आरपीआयने मागील निवडणूकीत 82 जागा निवडून आणल्या होत्या. 227 जागांपैकी सरकार स्थापनेसाठी 114 जागा निवडून आणने आवश्यक असते.

114 जागा निवडून आणण्यात आपल्याला काही अडचण येणार नाही. राज ठाकरे यांना सोबत घेतले तर भाजपाचे नुकसान होऊ शकते. यामुळे मनसेला सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नसल्याची माझी भूमिका आहे. रिपब्लिकन पक्ष मोठ्या ताकदीने भाजपा सोबत उभा आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT