मुंबई

मंत्रिमंडळ बैठकीला मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांचे फर्मान! 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई:  यापुढे मंत्रिमंडळ बैठकीला कोणताही मंत्री दांडी मारणार नाही. कितीही अडचण असली तरीही मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजे,असे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी  महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकी पूर्वीची बैठक होणार असून त्याची सुरूवात झाली आहे.

कोरोना रोगाच्या साथीमुळे मंत्रिमंडळ बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पाडल्या जात होत्या. त्यामुळे अनेक मंत्री बैठकांना दांडी मारायचे. तर काही मंत्री ऑनलाईन उपस्थित राहत होते. मात्र रेंज नाही. अथवा प्रवासात आहे असे सांगून या बैठकीतून काढता पाय घ्यायचे ही बाब अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले जाते.

कोरोना रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या लसीकरण कार्यक्रम जोराने सुरू आहे. राज्य सरकारने देखील मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न घेता प्रत्यक्ष भेटून पार पाडण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सह्याद्री या शासकीय विश्रामगृहात मंत्रिमंडळ बैठक पार पाडली. या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रालयाजवळ बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्याच्या अखत्यारीतील खात्या संदर्भातील असणाऱ्या विषयाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ऐनवेळी एखादा विषय चर्चेला आला तर त्यावर नेमके कोणी काय बोलावे याची रणनिती ठरल्याचे सांगितले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अजित पवार यांनी तर काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक महसूलमंत्री थोरात यांनी बोलावली होती. दोन्ही काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठकात मंत्रिमंडळ बैठकीत नेमके आणि मुद्देसूद चर्चा होऊन विषय मार्गी कसे लागतील. यावर यापुढे भर देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे तीन पक्षाचे सरकार असून तीन पक्षात मतभेद असले तरी मंत्रिमंडळ बैठकीत ताळमेळ असावा. राज्य सरकार आणि प्रशासन यातील भेद चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी नेमाने बैठक घेण्याचे निश्चित झाले असल्याचे सांगितले जाते.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT