मुंबई

एक मिनीट लघवीसाठी गेला, अन् कार झाली गायब

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्वकाही मोबाईलवर उपलब्ध झाले आहे. यातच ओला टॅक्सीचासुद्धा समावेश होतो. आधी टॅक्सीवाल्यांना एखाद्या जागी जाण्यासाठी बऱ्याच विनवण्या कराव्या लागत, मात्र आता ओला सारख्या अॅप्समुळे एका क्लिकवर हवी तिथे टॅक्सी उपल्ब्ध होते. परंतू याच टॅक्सी चालकांना बरेच त्रास देखील सोसावे लागतात. असाच एक ओला चालक रस्त्याकडेला लघवी करण्यासाठी थांबला असताना चोरट्यांनी चक्क त्याची कारच पळवून नेली आहे. यासंबधी शिळडायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईतील ओला चालक शिळ खर्डी रोडवर लघवी करण्यासाठी थांबला असताना, अज्ञात चोरट्यांनी चालकाच्या नकळत त्याची कार पळवून नेल्याचा प्रकार रविवारी (ता. 16) पहाटे घडला. जयप्रकाश यादव (33) असे चालकाचे नाव असून तो अंधेरीतील कोलडोंगरी येथे वास्तव्यास आहे.

जयप्रकाश हा रविवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भाडे सोडून परतत होता. तेव्हा, शिळ खर्डी रोडवरील भारत गिअर कंपनीनजीक यादवने कार रस्त्याकडेला उभी करून लघुशंकेसाठी गेला. परत आल्यानंतर पाहिले तर, चोरट्यांनी त्याची कार पळवली होती. याप्रकरणी, शिळडायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

web title : A minute went by for urination, and the car disappeared

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT