corona checkup
corona checkup 
मुंबई

कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मिरा-भाईंदरला इतक्या कोटी रुपयांचा निधी

सकाळवृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पावसाळ्यापूर्वी मिरा भाईंदर शहरात 'कोविड १९ हॉस्पिटल' / 'कोरोना केअर सेंटर' तयार करणे, शहरात आरोग्य सुविधेत वाढ करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्य केली आहे. राज्य सरकारने शहरात कोरोना केअर सेंटर उभारणे आणि आरोग्य सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे , अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (ता.27) दिली.

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पावसाळा तोंडावर आला असून जून, जुलै  'कोरोना'चे सर्वाधिक धोकादायक महिने असतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शहरात आरोग्य सुविधेत वाढ करण्याची गरज आमदार सरनाईक यांनी व्यक्त केली होती. राज्य सरकारने शहरात आरोग्य सुविधा वाढवण्याचे आदेश पालिकेला द्यावेत.  'कोरोना केअर सेंटर' सुरु करावे. यातून १ हजार अतिरिक्त खाटा, आयसीयू कक्ष, व्हेंटिलेटर, पुरेसा औषध साठा, आरोग्य यंत्रणा अशी आरोग्य व्यवस्था द्यावी, अशी विनंती सरनाईक यांनी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मागणी मान्य झाली आहे. 

आराखडे तयार करण्याचे आदेश
'कोरोना केअर सेंटर' बनविण्यासाठी मीरा भाईंदर शहरात योग्य अशी जागा निश्चित करून त्यासाठीचा आराखडा बनवून तो तत्काळ राज्य सरकारला मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांना सरकारने दिल्या आहेत.  पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. 

लवकरच आयएएस ऑफिसरची नियुक्ती  
मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाच्या मदतीला आणि फक्त 'कोरोना' उपाययोजनांचे कामकाज पाहण्यासाठी एक 'आयएएस' ऑफिसर दिला जावा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. ही मागणीही मान्य झाली असून लवकरच मिरा-भाईंदर महापालिकेत एक आयएएस ऑफिसर राज्य सरकारकडून नियुक्त केला जाणार आहे.

Mira Bhayander gets Rs 14 crore for fight against Corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT