मुंबई

प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची सोमय्यांची पोलिसात तक्रार

कुठे आहेत प्रताप सरनाईक?

वैदही काणेकर

ठाणे: ठाण्यातील ओवळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) मागच्या काही दिवसांपासून गायब असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीने ठाणे वर्तकनगरमध्ये आंदोलन केले. माजी खासदार किरीट सोमय्या, (Kirit Somaiya) आमदार निरंजन डावखरे आणि ५० रहिवाशांनी मानवी साखळी करुन आंदोलन केले. (Missing Pratap Sarnaik Complaint lodged at Vartak Nagar Police Station Thane by Kirit Somaiya)

भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी 'MR. India' लिहिलेले बॅनर हाती धरले होते. प्रताप सरनाईकांना 'MR. India' ठरवून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मागच्या १०० दिवसांपासून प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप आहे. त्याशिवाय किरीट सोमय्या यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

"प्रताप सरनाईक गायब असल्याचं आम्हाला सांगण्यात आलय. ते मातोश्रीमध्ये लपलेत असं बोलल जातय. म्हणून वर्तक नगरच्या मतदारांसह गायब आमदारांची तक्रार नोंदवण्यासाठी इथे आलोय. प्रताप सरनाईक मातोश्रीत असतील, तर त्यांना शोधून काढा" अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT