MLA disqualification case rahul narwekar CM Eknath Shinde said not fully satisfied Sakal
मुंबई

CM Eknath Shinde: कालच्या निकालातून आमच्यावर थोडा अन्याय झालाय; एकनाथ शिंदे असं का म्हणाले?

MLA disqualification case CM Eknath Shinde not fully satisfied: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल शिंदेंच्या बाजूने दिला आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल शिंदेंच्या बाजूने दिला आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. पण, एका बाबतीत काहीसा अन्याय झाल्याचं ते म्हणाले आहेत. प्रतोद भरत गोगावले यांनी बजाबलेला व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होता. त्यामुळे ठाकरेंच्या १४ आमदारांना अपात्र ठरवले जाणे आवश्यक होते, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील आनंद आश्रमात आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कालचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. एकधिकारशाही, हुकूमशाही याचा पराभव झाला आहे. कालच्या निर्णयामुळे एकमूखी हुकूमशाही चालणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले. बहुमताला महत्व असतं हे कालच्या निकालातून स्पष्ट झालं, असं ते म्हणाले. ( MLA disqualification case rahul narwekar CM Eknath Shinde said not fully satisfied )

भरत गोगावले हे आमचे प्रतोद आहेत. शिवसेना आमची आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. समोरच्या पक्षाने जे कागदपत्रं दिले ते खोटे होते. विधिमंडळात आमच्याकडे बहुमत असल्याचं सिद्ध झालं. मनापासून मी सर्वांना धन्यवाद देतो, असं शिंदे म्हणाले.

२०१९ मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भाजप-शिवसेना एकत्र लढले. पण, त्यानंतर महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सत्तेसाठी सोडले. त्यांना एक चपराक देण्याचं काम कालच्या निर्णयाने केलं आहे. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत, असं ते म्हणाले.

शिंदे पूर्ण समाधानी का नाहीत?

अध्यक्षांनी निर्णय देताना अधिकृत शिवसेना आमची म्हणून मान्यता दिली. प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली. गोगावले यांनी समोरच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी जी याचिका केली होती. ती नार्वेकरांनी फेटाळून लावली आहे. हे आमच्यासाठी अनपेक्षित होतं. त्यांनी निर्णय मेरिटवर दिला. त्यामुळे याबाबतही त्यांनी मेरिटवर निर्णय द्यायला हवा होता. आम्ही कायदेशीर टीमसोबत चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काल निकालानंतर बोलताना आमच्यावर थोडा अन्याय झाला असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. (Why is Shinde not fully satisfied?)

सर्वांना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. पण, ज्यांच्याकडे मेरिट आहे त्यांचा विजय होतो. आमच्याकडे मेरिट आहे. आमच्या बाजूने निकाल लागला म्हणून तो चुकीचा कसा? विधानसभा अध्यक्षांवर टीका होणे चुकीचं आहे, असं शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT