mla raju patil bhandarli dumping navi mumbai municipal corporation irshalwadi cm shinde politics sakal
मुंबई

Mumbai News : कोपराला गुळ लावला तर डंम्पिंग बंद करु - आमदार राजू पाटील

मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करतानाच भंडार्ली वरुन मनसे आमदारांचा इशारा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ईशाळवाडी दरड दुर्घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरती पोहोचले. त्यांनी मदत कार्यात हातभार लावला. त्यांचे काम पाहता त्यांचे कौतुक आहे. मात्र भंडार्ली डंम्पिंग बंद करणे व 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करणे यावरुन त्यांनी ग्रामस्थांच्या कोपराला गुळ लावला तर आम्ही ते सहन करणार नाही.

आम्ही रस्त्यावर उतरुन डंम्पिंग बंद करु असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक करतानाच भंडार्ली डंम्पिंग वरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला लगावला आहे. दिवेकरांची डंम्पिंग पासून मुक्तता करण्यासाठी दिवा येथील कचरा नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील 14 गावांतील भंडार्ली येथील जमिन भाडे तत्वावर घेत त्याठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा प्रक्रीया प्रकल्प उभारला.

वर्षभराच्या मुदतीवर हा घनकचरा प्रक्रीया प्रकल्प येथे उभारण्यात आला. मात्र आता या ठिकाणी कचऱ्याचा भला मोठा डोंगर तयार झाला आहे. कचऱ्यावर प्रक्रीया करणाऱ्या दोन मशिन येथे उपलब्ध आहेत. मात्र त्यातील एकच मशिन सुरु आहे.

या मशिनमध्ये कचरा वर्गीकरण करणे म्हणजे केवळ चोथा करुन बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे चिखल, घाणीचे साम्राज्य या ठिकाणी निर्माण झाले आहे. हे सांडपाणी खाली गावात वहात येत आहे, शेती, ओढ्यांत हे पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान झाले, शिवाय गावकऱ्यांचा मासेमारीचा व्यवसाय देखील बुडाला आहे.

दुर्गंधी, घाणीने गावकरी हैराण झाले असल्याने अखेर गावकऱ्यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना यात लक्ष घालण्यास सांगितले. आमदार पाटलांनी डंम्पिंग पाहणी केल्यानंतर घंटागाड्या रोखत डंम्पिंग बंद पाडण्याचा इशारा दिला.

यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्वरीत आमदार पाटील व ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी महिना भराची मुदत द्या असे आश्वासित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

त्यानुसार मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार होती. परंतू मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा, त्यानंतर आयुक्तांची तब्येत खराब होणे व ईशाळवाडी येथील दुर्घटना यामुळे हा विषय लांबणीवर पडला.

यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने रविवारी आमदार पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी 14 गाव सर्व पक्षिय विकास समिती व ग्रामस्थांनी ठाणे महापालिकेने डंम्पिंग बंद केले नाही तर आम्ही करु अशी भूमिका मांडली.

त्यावर आमदार पाटील यांनी ग्रामस्थांचा रोष शांत करताना गेल्या आठवड्यात काही घडामोडी घडल्याने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊ शकली नाही. ईशाळवाडीतील दुर्घटना पाहता मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करायला पाहिजे.

एवढे वर चढून गेले आणि प्रत्यक्ष जाऊन तिथे मदत कार्यात हातभार लावला. असे म्हणत त्यांनी जेव्हा टीका करायची तेव्हा ठोकून टीका करतो आणि जेव्हा चांगलं बोलायचं असतं तेव्हा बोलतो पण असे सांगितले.

भंडार्ली डंम्पिंग विषयी प्रशासनाने काही गोष्टींचे आश्वासन दिले होते. 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याविषयी त्याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत बोलणे झाले असून त्यांनी संबंधित विभागात याची अंतिम प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच भंडार्ली विषयी त्यांच्यासोबत बैठक घेऊन ते काय मत मांडतात हे ऐकायचे आहे. आपली भूमिका बदलली नाहीच आहे. यावेळी आपल्या कोपराला गुळ लावायचा प्रयत्न केला तर आपण डंम्पिंग बंद करु असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना देत अप्रत्यक्षरित्या सरकारला इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT