MLA Sada Saravankar clean cheat in shooting case mumbai police politics esakal
मुंबई

Mumbai News : आमदार सदा सरवणकरांना दिलासा...गोळीबार प्रकरणी क्लीन चीट?

प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचं पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रभादेवी परिसरात सदा सरवणकर यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

विशेष म्हणजे ती बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, मात्र गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचा पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सरवणकर यांना दिलासा मिळाला आहे.राज्यात जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पार पडली.

पण प्रभादेवी येथील मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली होती. या राड्यावेळी दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबाराची घटना घडली होती.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवाल आला. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले होते.

ती जप्त केलेली काडतुसे आणि त्यांच्या बंदुकीचे नुमने मिळते जुळत होते. मात्र आज पोलिसांनी सादर केलेल्या आवाहालात सरवणकर यांनी गोळी चालवली नसल्याचे सांगितले आहे

मिरवणकीत राडा

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता.

त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सदा सरवणकरांचीच होती हे स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतूसं आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की,

जप्त केलेली काडतूसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT