मुंबई

75 हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रतीक्षा; अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर; कोणत्या कॉलजमध्ये किती कटऑफ, वाचा

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी जाहीर झाली. या यादीनंतरही 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तर अद्याप 75 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या यादीत मुंबई विभागातील महाविद्यालयांमध्ये सर्व शाखांच्या एकूण 1,19,171 जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. यासाठी एकूण 1,16, 80 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी 45, 402 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या सुमारे 70 हजार 678 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण सहा हजार 179 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. दुसऱ्या फेरीनंतर एक लाख 16 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. या फेरीआधी कोट्यातील रिक्त जागा ऑनलाइन प्रक्रियेत वर्ग करण्यात येणार आहेत. यामुळे विशेष फेरीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

महाविद्यालयांचे कट ऑफ वाढले

शहरातील काही नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ वाढल्याचे या गुणवत्ता यादीत दिसत आहे. एचआर महाविद्यालयाचा कट ऑफ दुसऱ्या गुणवत्ता यादीत 470 इतका होता तो तिसऱ्या गुणवत्ता यादीत 471 इतका झाला आहे. तर केसी महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफ 449 इतका होता तो 451 इतका झाला आहे. तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये एका गुणाचाही फरक पडलेला नाही. 

दुसऱ्या यादीचे मुंबईतील शाखानिहाय अलॉट प्रवेश

  • कला - 3,908
  • वाणिज्य - 28,839
  • विज्ञान - 12,453
  • एमसीव्हीसी - 202
  • एकूण - 45,402

काही महत्त्वाच्या महाविद्यालयांचे दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कट ऑफ (500 पैकी गुण)

  • एचआर महाविद्यालय - वाणिज्य : 471
  • केसी महाविद्यालय - कला : 451  वाणिज्य : 461  विज्ञान: 450
  • जय हिंद महाविद्यालय - कला : 464 वाणिज्य : 464   विज्ञान: 446
  • रुईया महाविद्यालय - कला : 470  विज्ञान: 471
  • रुपारेल महाविद्यालय - कला : 451  वाणिज्य :460  विज्ञान: 457
  • साठ्ये महाविद्यालय - कला : 423   वाणिज्य : 451  विज्ञान: 450
  • डहाणूकर महाविद्यालय - वाणिज्य : 457
  • भवन्स महाविद्यालय -कला : 410  वाणिज्य : 445 विज्ञान: 439
  • मिठीबाई महाविद्यालय - कला : 452  वाणिज्य : 458  विज्ञान: 442
  • एनएम महाविद्यालय - वाणिज्य : 468
  • वझे-केळकर महाविद्यालय - कला : 454  वाणिज्य : 470  विज्ञान: 454
  • एमसीसी महाविद्यालय - वाणिज्य - 466
  • बांदोडकर महाविद्यालय - विज्ञान : 468

MMR region third cut of list declared 75 thousand still waiting for admission

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT