मुंबई

चीनला आणखी एक मोठा दणका, मुंबईतील हे 'मोठं' कंत्राटही गेलं हातातून... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - चीनने भारताशी लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर संपूर्ण भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतायत. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या भीषण झटापटीत २० भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागलाय. वेळ आली तर सीमेवर भारतीय सैनिक बुलेटने चिनी सैनिकांशी दोन हात करतीलच मात्र आपण व्हॉलेटने चीनसोबत लढू शकतो आणि चीनचा आर्थिक कणा मोडू शकतो. याचीही प्रचिती आता येण्यास सुरवात झालीये. अनेकाकांकडून बॉयकॉट चीनचा नारा दिला जातोय.   

याच पार्श्वभूमीवर भारताने चीनला आणखी एन मोठा दणका दिलाय. मुंबईतील मोनोरेलसाठीचं चिनी कंपनीला दिलेलं अंतिम टप्प्यातील कंत्राट MMRDA ने रद्द केलंय.

मुंबई मोनोरेल रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट अंतिम टप्प्यात होतं. आता हे कंत्राट रद्द करण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान, आता हे कंत्राट भातरतीय कंपन्यांना दिलं जाऊ शकतं. यामध्ये BHEL आणि BEML या कंपन्यांची नावं चर्चेत आहेत.

मुंबईतील महत्त्वाच्या अशा मोनो रेल प्रकल्पासाठी १० मोनोरेलचे रॅक्स तयार करायचे होते, केवळ रॅक्स तयार करणे नव्हे तर त्याचं डिझायनिंग आणि कमिशनिंग हे सर्व काम या दोन चिनी कंपन्यांना देण्यात येणार होतं. हे कंत्राट अंतिम टप्प्यात होतं.

दरम्यान या दोन्ही कंपन्यांकडून अटी आणि शर्थींमध्ये वारंवार बदल केले जावेत अशी विनंती करण्यात येत होती. या धर्तीवर हे कंत्राट आता चिनी कंपन्यांना मिळणार नसल्याची माहिती समोर येतेय. 

MMRDA cancels procurement of 10 Train sets for Mumbai Monorail

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT