मुंबई

मेट्रोच्या ट्रायलसाठी 'एमएमआरडीए'ने कसली कंबर; येत्या काही महिण्यात प्रकल्प पूर्ण होणार

कुलदीप घायवट

मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबईच्या उपनगरात वेगाने मेट्रोची कामे सुरु असून, मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 हे दोन्ही मेट्रो प्रकल्प येत्या काही महिन्यांत पुर्ण होण्याची शक्यता आहे. विशेषत: हे दोन्ही मेट्रो प्रकल्प वेगाने पुर्ण होत आहेत. यासह येथील मेट्रोच्या ट्रायल रन्स सुरू करण्यासाठी सज्ज आहोत, असे सुतोवाच प्राधिकरणाने केले आहे. 
शुक्रवारी (ता.8) रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी चारकोप मेट्रो डेपो आणि लाईन 2 अ आणि 7 येथील कामांना भेट दिली. याआधीही त्यांनी चारकोप येथील प्रकल्पाला आयुक्तांनी भेट दिली होती.   

त्यामुळे येथील काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. संपूर्ण कामकाज पूर्ण झाल्यावर पहिली मेट्रो ट्रेन ट्रायलसाठी मुंबईत लवकर येत असून, रोलिंग स्टॉक टीम सज्ज होत असून, त्यांना हैद्राबाद येथे प्रशिक्षण दिले जात आहे.
महानगर आयुक्त डी. के. शर्मा यांनी प्रकल्पाच्या कामाच्या प्रगती विषयी सविस्तर माहिती घेतली आहे, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.

 मुंबई इन मिनिटसचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात महत्त्वपुर्ण पाऊल उचलले गेल्याचा दावा प्राधिकरणाने करत आहे. त्यानुसार, मेट्रो-2 अ वर 58.86  टन वजनाचे एक स्टील गर्डर उभारण्यात आले आहे. तर, पोईसर नदीच्या येथे 75 मीटरचा स्टील स्पॅन बसविण्यात आला आहे. मेट्रो-2 अ डिसेंबरपर्यंत सुरु होणार होती. मात्र कोरोना, लॉकडाऊनमुळे या प्रकल्पास विलंब होत आहे. 

पश्चिम उपनगरातील या दोन्ही मेट्रो ठरल्याप्रमाणे धावू लागल्या तर, निश्चितच पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. कनेक्टिव्हिटी वाढेल. शिवाय प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव घेता येईल. दहिसर ते डी.एन. नगर असा मेट्रो 2 अ मुळे प्रवासाची वेळ 50 टक्के वाचणार आहे, असा दावा केला जात आहे.

MMRDA has speedup for the trial of Metro The project will be completed in the next few months

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT