MMRDA 
मुंबई

एमएमआरडीएची रखडलेली कामे पुन्हा सुरु

सकाळ वृत्तसेवा

 मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) रखडलेल्या प्रकल्पाची कामे आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. यामध्ये भिवंडी-कल्याणला जोडणारा दुर्गाडी पूल, ठाण्यातील माजीवाडा मेट्रो स्थानकाचे काम तसेच मुंबई-ठाणे यांना जोडणाऱ्या कोपरीच्या उड्डाणपूलाची कामे सुद्धा सुरु करण्यात आली आहे. यावेळी प्रकल्पस्थळी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची पुरेशी काळजी घेऊन काम केली जाते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शहर आणि महानगर परिसरातील पायाभूत सुविधांची कामेही ठप्प झाली. सध्या एमएमआरडीएतर्फे सर्वाधिक प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत. सहा मेट्रो मार्गिका, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि इतर उड्डाणपूल या कामांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच कोरोनाची भीती आणि हाताला काम नसल्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी कामगारांचे मूळ गावी स्थलांतर होऊ नये, म्हणून एमएमआरडीएने सुमारे 11 हजार मजूरांची व्यवस्था मुंबईतच करण्यात आली आहे; मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर अखेर एमएमआरडीएकडून रखडलेल्या कामांना सुरुवात केली आहे. यामध्ये भिवंडी-कल्याणला जोडणारा दुर्गाडी येथील खाडीपुलाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याच्या तीन मार्गिका मे अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्‍यता आहे.

सध्या हे काम डोंबिवलीच्या दिशेने झाले असून भिवंडीच्या दिशेने कामे करण्यात येत आहे. तसेच ठाण्यातील माजीवाडा मेट्रो स्थानकाच्या कामाबरोबर मुंबई - ठाणे यांना जोडणाऱ्या कोपरीच्या उड्डाणपूलाची कामे सुरु करण्यात आली आहे. प्रकल्पांची कामे करताना कामगारांकडून योग्य ती स्वच्छता राखली जात आहे. तसेच त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था कंत्राटदारांतर्फे करण्यात आल्याचे, एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT