मुंबई

मोनोचा तोटा भरून काढण्यासाठी MMRDA ची जाहिरातबाजी; नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न

कुलदीप घायवट


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर मोनो रेल चालविण्यात येत आहे. अनलॉकमध्ये नुकताच मोनोरेल सुरु झाली आहे. मात्र प्रवाशांची संख्या कमी असल्याने मोनोच्या महसूलावर परिणाम होत आहे. आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता जाहिरातबाजी करणार आहे. यातून मोनोला नफ्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

सध्या स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या स्वदेशी सुट्ट्या भागांचा वापर करून मोनोरेलची पुनर्बांधणी केली जात आहे. सुट्ट्या भागांच्या खरेदीचा खर्च परदेशी विक्रेत्यांच्या किंमतीच्या तुलनेत ७४ टक्के एवढा कमी झाला. त्यामुळे  पुनर्बांधणीच्या खर्चात बचत होत आहे. मात्र, प्रवाशांची संख्या कमी असल्याने मोनोरेलच्या खाबांना जाहिरातबाजी करून महसूल वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. 

चेंबूर, वडाळा येथून लोअर परळ येथे येण्यासाठी प्रवासी मोनोरेलचा फार कमी प्रमाणात वापर करतात. परिणामी, मोनोरेल तोटयात आहे. परंतु, प्रवासी वाढविण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरु आहेत. प्राधिकरणाकडील माहितीनुसार, दोन मोनोरेलच्या वेळेतील अंतर कमी करण्यासाठी भर दिला जात आहे. दोन मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढून उत्पनात भर होत जाईल. यासह दादर, महालक्ष्मी यासारख्या जास्त रहदारीच्या ठिकाणी मोनोरेलच्या खांबावर जाहिरातबाजी करून महसुलात भर पडेल.

MMRDAs advertising to make up for the loss of mono Trying to make a profit

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT