mmrad  
मुंबई

एमएमआरडीएच्या रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गती, 'ही' कामे सुरु

सकाळवृत्तसेवा

मुंबई: लॉकडाऊनदरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गती देण्यात आली आहे. यामध्ये सहा मेट्रो मार्गिका, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि उड्डाणपूल या कामांचा समावेश आहे.  

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्यामुळे केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊन आणखी वाढवला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यावर एमएमआरडीए प्रकल्पांच्या कामाला अंशत: स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव नसलेल्या भागांत काम करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सहा मेट्रो मार्गिका, मुंबई पारबंदर प्रकल्प, उड्डाणपूल आदी प्रकल्पांची कामे सुरू झाली. 

डी. एन. नगर ते मंडाले या 23.63 किलोमीटरच्या मेट्रो-2 बी उन्नत मार्गिकेवर गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावर 22 स्थानके असून, 10,986 कोटी रुपये खर्च येणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यावर एमएमआरडीएने 11 हजार मजुरांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांना मूळ गावी पुन्हा जाण्यापासून रोखण्यात यश आले. आता या मजुरांच्या बळावर एमएमआरडीएने पुन्हा कामे सुरू केली आहेत. पावसाळापूर्व कामांनाही सुरुवात झाली आहे. 

इंटरचेंज सोय
मेट्रो-2 मार्गिकेला इंटरचेंज सुविधा असेल. ही मार्गिका घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-1 मार्गिकेला डी. एन. नगर येथे, कुलाबा ते सीप्झ मेट्रो-3 मार्गिकेला बीकेसी येथे, मोनोरेलला चेंबूर येथे आणि मेट्रो-4 मार्गिकेला पूर्व द्रुतगती महामार्गावर जोडली जाणार आहे.

MMRDA's stalled projects Work on Metro Corridor, Parbandar, flyovers started

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT