मुंबई

उगाचच काहीतरी झगामगा माझ्याकडे बघा, राजू पाटील यांचा आशिष शेलारांवर पलटवार

पूजा विचारे

मुंबई: राज्यात २०१९ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणातलं चित्र बदलेलं पाहायला मिळालं. शिवसेनेनं भाजपपासून काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत ऐतिहासिक आघाडी करत सत्ता स्थापन केली. या घडलेल्या घडामोडीनंतर भाजप आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी नव्या साथीदाराचा शोध घेत असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसेची जवळीक वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या युतीचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये काही कारणास्तव जुंपली असल्याचं चित्र आता पाहायला मिळालं. 

भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजप- मनसे युतीवर प्रतिक्रिया दिली. त्यावर आता  मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक असं प्रत्युत्तर दिलं आहे. अजून तरी भाजप-मनसे यांच्यात युतीबाबत काही बोलणं झालेलं नाही. आम्ही एकट्याच्या जीवावरच इतिहास घडवणार आहोत,' असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं. शेलार यांच्या या वक्तव्याचा राजू पाटील यांनी जोरदार समाचार घेतला. 

आम्ही त्यांना कुठे विचारलं आहे. आम्हाला घ्या असे आम्ही त्यांना विचारायला गेलो आहे का उगाचच काहीतरी झगामगा माझ्याकडे बघा हे असं चालतं नाही. आम्ही विचारलं तर तुम्ही त्यावर बोला. प्रतिक्रिया द्या. जर आम्ही विचारलचं नाही, तर यावर का प्रतिक्रिया देत आहात, असं म्हणत राजू पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

आम्ही अजून तरी भाजप-मनसे युतीची बातचीत केलेली नाही. अकेले दम पर भी हम इतिहास करने वाले हे,” असं आशिष शेलार म्हणाले होते. यावर उत्तर देताना राजू पाटील यांनी आशिष शेलारांना टोला लगावला.

MNS and BJP alliance discussion Rumors Raju Patil criticizes Ashish Shelar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT