मुंबई

लोकल ट्रेन्स आणि ST बसच्या मुद्द्यावरून शिवसेना-मनसे आमनेसामने, परबांच्या उत्तरावर देशपांडेंचा प्रतिसवाल

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे खाकलेत. याला पार्श्वभूमी आहे राज्यातील बस सेवा आणि ट्रेन सेवा सुरु करण्याची. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येताना दिसत नाही. अशात कालपासून महाराष्ट्र सरकारने राज्यात पूर्ण क्षमतेने बसेस सुरु करण्यास परवानगी दिली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता निशाणा साधलाय.

मनसे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केलीये.  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली खरी. मात्र, अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. 

नाही वाद सुरु कसा झाला ?  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. यावर अनिल परब यांनी मनसेला सवाल केला होता. ट्रेन सुरु केल्यानंतर सगळी जबाबदारी मनसे घेणार का ?असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला होता. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलंय.  

काय म्हणालेत संदीप देशपांडे : 

गेले सहा महिने लोकांनी कोमट पाणी प्यायलं आहे. तरीही त्यांना कोरोना झालाच. आता १०० टक्के ST बस सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केलाय. जनतेची जबाबदारी घेण्यासाठी तुम्हाला  सरकारमध्ये बसवलं आहे, हे लक्षात असू द्या, असं संदीप देशपांडे म्हणालेत.  

mns and shiv sena fights over transportation system in maharashtra read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Jam: बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी; अनेक तास अडकल्याने प्रवासी त्रस्त, पाच ते सहा किमी रांगा

DHURANDHAR COLLECTION: धुरंधरने केली बक्कळ कमाई! आतापर्यंतचं कलेक्शन वाचून थक्क व्हाल!

Truck Tempo Accident: पाथरी-पोखर्णी रस्त्यावरील अपघातात ट्रकचालक ठार; ट्रक टेंम्पो ट्रेलरची धडक, दोन तास वाहतूक ठप्प

Kolhapur Pregnant Woman : गोव्यातून बेपत्ता झालेल्या पाच महिन्यांच्या गर्भवतीचा मृतदेह रंकाळ्यात आढळला, हृदयद्रावक घटना!

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT