Raj Thackeray Ayodhya Visit Sakal
मुंबई

भाजपाच्या विरोधादरम्यान राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

अयोध्या दौरा जाहीर केल्यापासून उत्तर प्रदेशातल्या भाजपा नेत्याने त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला होता.

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांमध्ये चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांच्या सभा, भोंग्यांबद्दलची भूमिका, राज्यातल्या विविध ठिकाणचे दौरे, महाआरती सगळ्याचीच राज्यभरात चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून मोठं राजकारण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशातही सुरू आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातल्या भाजपा नेत्याकडून विरोध होत असतानाच आता या दौऱ्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. (Raj Thackeray Ayodhya visit postponed)

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाला आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत याबद्दल अधिक माहिती देणार असल्याचंही राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी राज ठाकरेंची तब्येत बिघडल्याने हा दौरा स्थगित झाला असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. दरम्यान, उत्तर प्रदेशातले भाजपा नेते बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांना अयोध्येत येता येईल, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर मुंबई भाजपानेही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. मुंबई भाजपाचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर आणि सर्व कष्टकरी वर्गाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा कडाडून विरोध असेल, असा इशारा दिला आहे. संजय ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांना यासंदर्भातलं निवेदनही दिलं आहे. उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जी मारहाण झाली, त्याविषयी राज ठाकरे यांनी खेद व्यक्त करायलाच हवा. भविष्यात भाजपासोबत युती करण्याआधी हे व्हायला पाहिजे आणि भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंवर दबाव आणायला हवा, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT