MNS Raj Thackeray Sakal Media
मुंबई

मराठी कामगार सेनेचा कार्य अहवाल मोबाईल अॅपवर, कृष्णकुंजवर लोकार्पण

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी अॅप चे लोकार्पण

प्रशांत कांबळे

मुंबई : कामगारांना त्यांच्या न्याय हक्क, योजनांची (Worker Justice) माहिती देणारे आणि त्यांच्यासाठी मराठी कामगार सेनेच्या( Marathi Worker Union) कार्याची माहिती देणारे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी कृष्णकुंज येथील मनसे(MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या घरी या अॅप चे लोकार्पण करण्यात आले. (MNS Chief Raj Thackeray inaugurated Mobile app For Workers Justice-nss91)

महाराष्ट्रातील मराठी कामगार बंधू भगिनींच्या अडीअडचणी आणि प्रश्नांसाठी मनसे प्रणित मराठी कामगार सेना गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे.कोरोनाच्या गेल्या दीड वर्षाच्या काळातही मराठी कामगार सेने मार्फत कामगारांना मदत करण्यात आली त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या पगारापासून ते आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी मराठी कामगार सेना या कामगारांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली आहे.

बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार आता मराठी कामगार सेनेने कामगार बंधू भगिनींच्या सोयीसाठी त्यांना मदत व्हावी यासाठी मराठी कामगार सेनेचा ऍप बनवला आहे. हा ऍप डाउनलोड केल्या नंतर कामगारांना मराठी कामगार सेने विषयी इत्यंभूत माहिती मिळणार आहे.कामगार कायदे या विषयी ही कामगारांना माहिती मिळणार आहे त्यातून कामगारांमध्ये ही जागृती निर्माण होणार आहे.

कामगारांना काही अडचणी असतील त्यांच्या काही सूचना असतील तरी कामगार ऍप वर जाऊन त्या मांडू शकतात त्याची तात्काळ मराठी कामगार सेने मार्फत नोंद घेतली जाईल आणि त्यावर काम ही केले जाईल.ऍप सोबतच या संदर्भात मराठी कामगार सेनेच्या कार्यालयाकडून कामगारांना संपर्क साधून ही माहिती देण्यात येईल.महत्वाचे म्हणजे या ऍप च्या द्वारे कामगारांना मराठी कामगार सेनेचे प्राथमिक सदस्यत्व ही स्वीकारता येणार आहे.

- महेश जाधव, अध्यक्ष, मराठी कामगार सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SpiceJet च्या अडचणी वाढल्या! DGCA ची कारणे दाखवा नोटीस; विमानसेवेवर गंभीर आक्षेप, प्रवाशांनाही सूचना

IND vs AUS Controversy: 'गौतम गंभीरचा फोन आलेला...' ड्रेसिंग रूम लीक वादावर सर्फराज खानचा मोठा खुलासा

Baby Elephant: उपचारासाठी ‘राजा’ विमानाने ‘वनतारा’मध्ये ,संस्थापक अनंत अंबानी यांचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारची पादचाऱ्याला जोराची धडक; अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

वीकेंडला मनोरंजनाची मेजवानी! 'ढिंढोरा २' ते 'कॅम्पस डायरीज २', ओटीटीवर रिलीज झाले 'हे' चित्रपट अन् सीरिज

SCROLL FOR NEXT