raj.jpg 
मुंबई

लॉकडाउनबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेणार? मनसेने दिली महत्त्वाची माहिती

दीनानाथ परब

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. विविध निर्बंध लागू करुनही ही रुग्णवाढ आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोनाची रुग्णवाढ कशी थोपवायची, या बद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. लॉकडाउन लावायचा की, नाही याबद्दल बैठकीत सर्वकष चर्चा झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी आपआपली भूमिका मांडली. आजच्या या बैठकीचे राज ठाकरेंनाही निमंत्रण होते. पण ते उपस्थित नव्हते. राज ठाकरे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या पाठीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपासून त्यांच्या पाठीला त्रास होत होता. त्यानंतर आज त्यांच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवसांपूर्वी टेनिस खेळताना त्यांच्या पाठीला मुकामार लागला होता.

त्यावेळी त्यांच्या हातालाही दुखापत झाली होती. गेले काही दिवस त्यांची पाठ दुखत होती. पाठदुखी थांबावी यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध-गोळ्या घेतल्या होत्या, पण त्या औषधांनी त्यांना बरं वाटलं नाही. त्यामुळे अखेर त्यांना शनिवारी सकाळी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह वेगवेगळ्या नेत्यांनी लॉकडाउनच्या विषयावर आपपाली मत मांडलेली असताना राज ठाकरे यांची भूमिका काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक टि्वट केले आहे. त्यात त्यांनी लॉकडाउन संदर्भातील भूमिका ही राजसाहेब जाहीर करतील, असे म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT