मुंबई

‘गुजराती क्‍लिप’ने कल्लोळ

सकाळवृत्तसेवा

मुंबई - रिबेल्स आणि गोवर रोगांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने सादरीकरण केलेली गुजराती भाषेतील एक व्हिडीओ क्‍लिप सोमवारी मनसेने व्हायरल केली. त्यामुळे शिवसेनेची मोठी अडचण झाली. त्या क्‍लिपने शिवसेना व भाजपमध्ये कल्लोळ माजविला. 

पालिकेच्या रुग्णालयात गुजराती भाषेतून प्रशिक्षण कशासाठी, असा सवाल करीत मनसेने त्या व्हिडीओ क्‍लिपवर जोरदार आक्षेप घेतला. शिवसेनेची सत्ता असताना गुजराती भाषेतून आरोग्यविषयक प्रशिक्षण कसे काय दिले जाते, असा सवाल मनसेने केला. 

गेल्या महिन्यात रिबल्स आणि गोवर रोगांवर प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्यात त्याबाबतची ही क्‍ल्पि होती. या रोगांवर प्रभावी उपाययोजना गुजरातमध्ये झाली होती. तेथे कशी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली त्याबाबतची ही व्हिडीओ क्‍लिप होती. ती गुजराती भाषेत असल्याने ती त्याच भाषेत दाखविण्यात आली. मात्र, प्रशिक्षण मराठी आणि इंग्रजीतून देण्यात आल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव यांनी केला. क्‍लिपचा तेवढाच भाग व्हायरल केला आहे. त्याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. प्रश्‍न भाषेचा आहे. त्यामुळे त्या क्‍लिपबाबत चर्चेला उधाण आले होते. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ही व्हिडीओ क्‍लिप व्हायरल केली होती.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुजराती भाषेचा काय संबंध? आतापर्यंत हिंदी भाषा राष्ट्रभाषा म्हणून लादली जात होती. आता गुजराती भाषा राष्ट्रभाषा म्हणून लादणार का? हे प्रशिक्षण किती शिक्षकांना समजले आणि गुजराती भाषेत प्रशिक्षण मिळाल्याने त्यांना जनजागृती कशी करता येणार? हा प्रकार निंदनीय आहे. 
- संदीप देशपांडे, प्रवक्ता, मनसे

शिक्षकांना मराठी आणि इंग्रजी भाषेतून प्रशिक्षण देण्यात आले. याच पद्धतीचे प्रशिक्षण गुजरातमध्येही झाले. गुजरातमधील प्रशिक्षणाचा अनुभव सांगणारा व्हिडीओ प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना दाखवला गेला. गुजरातमधील प्रशिक्षण असल्याने हा व्हिडीओ गुजराती भाषेत होता. 
- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT