मुंबई

शिवसेना भवनासमोर मनसेचा भोंगा; रामनवमीला नाकावर टिच्चून लावली हनुमान चालिसा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष अलिकडे ऍक्टीव्ह झालेला दिसून येतोय. गुढीपाडव्यानिमित्ताने शिवाजी पार्कवर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर सर्व मनसैनिकांना पुन्हा एकदा तरतरी आली आल्याचं दिसून येतंय. राज ठाकरेंनी केलेलं 'मशीदीवरील भोंगे हटवा, अन्यथा हनुमान चालिसा लावू', हे विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं आणि त्याबरहुकूम वागणाऱ्या मनसैनिकांनी ठिकठिकाणी भोंगे लावायला सुरुवातही केली. त्याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता शिवसेना पक्षाचं मुख्यालय असलेल्या 'शिवसेना भवना'बाहेर लाऊडस्पीकर लावले आहेत. या लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली आहे. आज रामनवमीचं औचित्य साधत मनसेनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (Raj Thackeray)

आता मनसेचे हे लाऊडस्पीकर जप्त करत मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मनसैनिकांनी राबवलेल्या या उपक्रमाला प्रशासनाने ठिकठिकाणी हरकत घेतल्याचंही दिसून आलं. काही ठिकाणी त्यांचं सामान ताब्यात घेतलं तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य मनसैनिकांनी शिरसावंद्य मानत उपक्रम राबवला असला तरी पुण्यात मात्र, यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून आलं. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी या निर्णयाविरोधात भूमिका घेत मी असं करणार नसल्याचं सांगितलं. त्यावरुन त्यांना आपलं पदही गमवावं लागल्याचं दिसून आलं. मात्र, ते आपल्या मुस्लिम कार्यकर्त्यांसह आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. (Raj Thackeray)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi targets PM Modi : ''मोदीजी, तुमचे मौन बरेच काही सांगते, तुम्ही यासाठी गप्प आहात, कारण...''

आरबीआयकडून बँकांना मोठी भेट! अर्थव्यवस्थेला चालना मिळणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Mumbai News: मुंबईत भारतातील पहिले मॅन्ग्रोव्ह पार्क तयार! पर्यटकांसाठी कधी आणि कुठे खुले होणार? जाणून घ्या खासियत...

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाने मंडणगडात हाहाकार; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Elon Musk Trillionaire : बापरे! एलॉन मस्क यांना चक्क 8,86,48,70,00,00,000 रुपये पगार?

SCROLL FOR NEXT