tanushree dutta, raj thakrey, nana patekar
tanushree dutta, raj thakrey, nana patekar 
मुंबई

राज ठाकरेंसारखा गुंड नेता असतो का?: तनुश्री दत्ता

सकाळवृत्तसेवा

मुंबईः राज ठाकरेंसारखा नेता असतो का? नेता गुंडगिरी करत नाही, महिला-मुलींना त्रास देत नाही त्यांचे रक्षण करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सनेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, त्यामुळे ते चिडले आहेत त्यांना ‘सरकार राज’ आणायचे असून, स्वतःला सिद्ध करायचे आहे, असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना तनुश्री दत्ता म्हणाली, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी मोटार फोडली आहे. राज ठाकरे गुंड आहे, त्याने आपल्यासारखेच गुंड पक्षात घेतले आहेत, त्यांना तो तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतो. नेता तो असतो जो कमकुवत, कमजोर माणसाना संरक्षण देतो. महिलांवर हल्ला करणारा नेता असतो.'

दरम्यान, 'आशिक बनाया अपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. नाना पाटेकर कॅरेक्टर आर्टिस्टच राहिला त्याला कोणतीही अभिनेत्री कोणतीही मुलगी भाव देत नाही. त्यामुळे तो मुलींसोबत गैरवर्तन करतो. हिरोच्या आसपास अनेक मुली घुटमळताना दिसतात. नाना पाटेकरजवळ तुम्ही एका तरी मुलीला फिरकताना पाहिलं आहे का? असाही प्रश्न तनुश्री दत्ताने विचारला आहे.

तसे काहीच घडले नाही : राकेश सारंग
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग म्हणाले, की माझ्या माहितीप्रमाणे तरी तनुश्री दत्ता सांगते तसे सेटवर काही घडलेच नव्हते. सेटवर 400 ते 500 लोक होते. 200 ते 250 ज्युनियर आर्टिस्टही होते. असभ्य वर्तन करायचे कुणी ठरवलेच, तर तो एवढ्या लोकांसमोर असे काम करणार नाही. मुळात असे काही घडलेच नाही. एखाद्या विरोधात बोलण्याआधी त्याने वाईट कृत्य केले आहे, हे आम्हाला दिसले पाहिजे. तसे आम्हाला कधीच दिसले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT