Raj Thackeray News 
मुंबई

MNS : "उखाड दिया..."; अनधिकृत मजारीवरील कारवाईनंतर मनसेची पोस्ट व्हायरल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहिममधील अनधिकृत मजारीवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पाडवा मेळाव्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून माहिममधील अनधिकृत मजारीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनसेकडून ट्विटद्वारे प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत करण्यात आलं आहे. यामध्ये राज ठाकरे यांचा पाडवा मेळाव्यातील भाषणाचा फोटो पोस्ट करत त्यावर महाराष्ट्रात अनधिकृत मजारींची मुजोरी चालणार नाही, असं लिहित. उखाड दिया! असं लिहिलं आहे. तसेच या फोटोला गड्यांनो...माहिमची मोहीम फत्ते झाली, मजारीची मुजोरी उखडून टाकली! अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

दरम्यान, पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्क्रीनवर माहिमच्या समुद्रात एका बेट सदृश्य जागेत एक मजार तयार करण्यात आल्याचा व्हिडिओ दाखवला होता. या मजारीला भेट देण्यासाठी अनेक लोकांची ये-जा सुरु असल्याचंही त्यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत सांगितलं होतं. तसेच या ठिकाणी दुसरं हाजीआली तयार होत असल्याचा आरोप करत शासनाचं दुर्लक्ष असलं की असे अनधिकृत बांधकामाचे प्रकार होत असतात असा आरोपही केला.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

तसेच जर हे अतिक्रमण शासनानं हटवलं नाही तर त्याच्या शेजारीच आम्ही गणपतीचं मंदिर उभारू असा इशाराही राज ठाकरे यांनी राज्य शासनाला दिला होता. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळीच हे अनधिकृत बांधकाम हटवण्याची मोहिम राज्य शासनाकडून हाती घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT