Amit Thackeray Raj Thackeray Bala Nandgaonkar Sakal
मुंबई

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या समोरच अमित ठाकरेंनी बाळा नांदगावकरांना बाजूला सारलं अन्...

अमित ठाकरेंचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातल्या गेल्या काही दिवसांपासून सत्तानाट्याचा खेळ सुरू आहे. या काळातल्या घडामोडींचा फायदा मनसे आपल्या पक्षबांधणीसाठी करुन घेत आहे. मनसे नेत्यांच्या सातत्याने होणाऱ्या बैठका, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचे सातत्याने होणारे दौरे या सगळ्याची चांगलीच चर्चा आहे.

अमित ठाकरेंच्या दौऱ्यांची काही ना काही कारणाने चर्चा सुरू असते. कधी रेल्वेप्रवास असेल, कधी फुटबॉल खेळणं असेल. आता पुन्हा एकदा अमित ठाकरेंची (Amit Thackeray) चर्चा रंगली आहे. या चर्चेचं कारण म्हणजे त्यांची एक कृती. तर झालं असं की, राज ठाकरेंच्या घरी यंदा नातवाचं आगमन झाल्यानं त्यांनी घरी गणपती बसवला आहे. त्यांच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी यंदा अनेक नेते त्यांच्या घरी भेट देत आहेत.

दरम्यान, मनसेच्या प्रवासात पहिल्यापासून राज ठाकरेंच्या सोबत असणारे बाळा नांदगावकरही राज ठाकरेंच्या घरी गणेशोत्सवासाठी आले होते. यावेळी त्यांचं फोटोशूट सुरू होतं. फोटो काढताना शर्मिला ठाकरे, राज ठाकरे, त्यांच्या बाजूला अमित ठाकरे आणि त्यांच्या बाजूला कोपऱ्यात बाळा नांदगावकर उभे होते. मात्र तेवढ्यात अमित ठाकरेंनी बाळा नांदगावकरांना (Bala Nandgaonkar) बाजूला सारलं आणि त्यांना राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) शेजारी उभं केलं.

अमित ठाकरेंच्या या कृतीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. मनसेच्या अनेक नेत्यांसोबतच सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सन्मान देणं काय असतं हे अमित ठाकरेंकडून शिकावं, अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडीओवर देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: पुढच्या तीन तासांत मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT