मुंबई

'चक्री वादळाला लाजवेल असा दौऱ्याचा वेग होता' खरच BEST C M

पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही...

दीनानाथ परब

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एकदिवसाचा कोकण दौरा केला. तौक्ते चक्रीवादळाचा (Taukte cyclone) तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची (kokan tour) त्यांनी पाहणी केली. "विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ" अशी माहिती मुख्यंत्र्यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली. (Mns sandeep deshpande salm chief minister uddhav thackeray over kokan tour)

पंचनामे पूर्ण होताच मदती संदर्भात निर्णय घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात दिले. "मी वैफल्यग्रस्त नाही, मी येथे दुःख जाणून घ्यायला आलो आहे. दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही" असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर मनसेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. 'चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात' असे संदीप देशपांडेंनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

राणेंचं घर पहायला मुख्यमंत्री आले होते का?

भाजपा आमदार नितेश राणे यांनी सुद्धा मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर (sindhurdurg district) आलेले मुख्यमंत्री (CM uddhav thackeray) कुठल्याही नुकसानग्रस्तांना भेटले नाहीत की एक रूपयाचे पॅकेज जाहीर केले नाही. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याने सिंधुदुर्गवासीयांची घोर निराशा झाली आहे. चिवला बीचवर राणेंच घर पहायला मुख्यमंत्री आले होते का? असाही टोला नितेश राणे (nitesh rane) यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT