raj thackeray and kranti redkar 
मुंबई

"गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी"

"क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही."

स्वाती वेमूल

"क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही."

केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथक (NCB) आणि विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्या बहिणीवर होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी "गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर Kranti Redkar यांच्या पाठिशी उभी राहणार", असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीच्या टीमने कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. समीर हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत.

"क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही. गरज भासली तर क्रांती यांच्या पाठिशी मनसे उभी राहील," असं खोपकर म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीवर टिकाटिप्पणी होत आहे. एकीकडे बॉलिवूडमधील कलाकार शाहरुखला पाठिंबा दर्शवत असताना एनसीबीच्या पाठिशी कोणी उभं राहत नसल्याचीही चर्चा आहे.

टीकाकारांना क्रांतीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सडेतोड उत्तर दिलं होतं. त्याचप्रमाणे एनसीबीच्या कामाचं कौतुक करणाऱ्यांचे आभार मानले होते. 'तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. विशेषकरून एनसीबीचे प्रयत्न, त्यांचे सततचे छापे, निर्भिड मेहनत ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने जेव्हा बॉलिवूडचा संबंध येतो तेव्हाच लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या स्तुत्य कार्याचं रिपोर्टिंग माध्यमांकडून सातत्याने होत आहे. गुंडांना पकडण्याचं त्यांचं कामसुद्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुमचा पाठिंबा, प्रेम असंच वाढत जाईल अशी आशा करते. समाजात असे काही घटक आहेत, जे बॉलिवूडला लक्ष्य केल्याचं म्हणत एनसीबीला दोष देत आहेत. मी त्यांना विनंती करते की कृपया आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि नंतर टिप्पणी करा. ते दररोज संघर्ष करत असताना आपण आपल्या घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून अशा टिप्पणी टाइप करतोय. नि:स्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्यांसोबत चांगले वागुयात,' अशी पोस्ट तिने लिहिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT