नवाब मलिक नवाब मलिक
मुंबई

छातीत कळ आणण्याचे 27 उपाय; भाजप नेत्याने मलिकांसाठी सुचवलं पुस्तक

न्यायालयाने मलिक यांना 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले भाजपचे नेते मोहित कंबोज पुन्हा एकदा त्यांच्या ट्वीटनंतर चर्चेत आले आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. (Mohit Kamboj Tweet After Malik Health Issue)

मलिक यांची ईडी (ED Custody) कोठडीत गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मात्र, आज मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यांनी पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अटक झाली होती. त्यावेळी त्यांनी अनेकदा छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीचा संदर्भ घेत कंबोज यांनी छगन भुजबळ यांचा फोटो असलेले एका पुस्तकाचे ट्वीट केले असून, त्यावर 'छातीत कळ आणण्याचे सत्तावीस उपाय' अशा शिर्षकाखाली एक ट्वीट केले आहे. त्यांचे हे ट्वीट मलिक यांची प्रकृती खालावल्यानंतर आल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, कंबोज यांनी या ट्वीटच्या माध्यमातून मलिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT