मुंबई

टॉप्स सेक्युरीटी घोटाळा प्रकरण : विहंग सरनाईक यांची 6 तास ईडी चौकशी 

राजू परुळेकर

मुंबई, ता.23 : टॉप्स सेक्युरीटी घोटाळा प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची सक्तवसुली संचालनालय (ED) अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा चौकशी केली. विहंग सरनाईक दुपारी 12 वाजता दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास त्यांची कसून चौकशी केली.

आजच्या चौकशीत टॉप्स ग्रूपचे अधिकारी आणि प्रताप सरनाईक यांच्या विश्वासू सहकाऱ्यामध्ये झालेल्या पैशाच्या व्यवहाराबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना  प्रश्न केल्याचे कळतेय. सोमवारी (21 डिसेंबर ) प्रताप सरनाईक यांच्या  पुर्वेश आणि विहंग  या दोन्ही मुलांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. प्रताप सरनाईक यांनाही चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले आहेत.

यापुर्वी 10 डिसेंबरला आमदार प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी झाली होती. 24 नोव्हेंबरला या आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई, ठाण्यातील 10 कार्यालयात, टॉप्स ग्रूपशी संबधीत कार्यालये आणि राहूल नंदा यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. या छाप्यादरम्यान विहंग सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांचे सहकारी अमित चांडोले, टॉप्स ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक एम शशीधरण यांनाही अटक करण्यात आली आहे.

ED चौकशीत कायम सहकार्य करणार असल्याचं या आधीच प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.  

( संपादन - सुमित बागुल )

money laundering case tops group ed enquiry of pratap sarnaiks son vihang sarnaik conducted for six hours

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT