Flood Alert esakal
मुंबई

Flood Alert : पूरस्थिती उद्‌भवताच सेन्सर करणार अलर्ट; 'इतक्या' सेन्सरची देखभाल-दुरुस्ती पूर्ण

उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना मॉन्सूनचे (Monsoon) वेध लागले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये दिली जाते.

ठाणे : उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना मॉन्सूनचे (Monsoon) वेध लागले आहेत. काही दिवसांत पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनही पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहे.

त्यासाठी येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटनांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष (Disaster Management Room) आणि संबंधित यंत्रणांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

ठाणा कॉलेज, वृंदावन पम्पिंग स्टेशन, साकेत पाईपलाईन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेन्सर्स काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा प्रभावी वापर करण्याची सूचना ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी काऊन्सिंग ऑन एनर्जी, एन्व्हायर्न्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) या वातावरण बदल क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हा कृती आराखडा तयार केला आहे.

अशी मिळणार माहिती

पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये दिली जाते. त्यानुसार मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना तातडीने संदेश पाठवले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT