state goverment
state goverment sakal media
मुंबई

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 'ऑपरेशन ऑलआऊट'

अनिष पाटील

मुंबई : पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सोमवारपासून सुरू होत आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री शहरात 'ऑपरेशन ऑलआऊट' (Operation All out) राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 1036 सराईत गुन्हेगारांची (Criminals) तपासणी करण्यात आली. तसेच 383 आरोपी सापडले आहेत. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत 99 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. ( Monsoon Session basis Mumbai police on checking of 1036 criminals )

गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात सक्रिय मोहिम राबविण्यासाठी मुंबई पोलीसांनी शनिवारी मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवले. सह पोलीस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व 5प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व 13 परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले.

प्रत्येक पोलीस ठाण्यांमधुन जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टिमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी , संशयास्पद व्यक्ती व क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे व कोम्बिंग ऑपेरशन चे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे,प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वारंटची बजावणी,अवैध दारू, जुगार ई. अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

ऑलआउट मध्ये पुढील कारवाई करण्यात आली

-मुंबई शहरात एकुण 252 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले , त्यामध्ये अभिलेखावरील 1036 आरोपी तपासण्यात आले . त्यामध्ये 383 आरोपी मिळून आले.

- एकुण 99 जणांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

• अवैध शस्त्रे बाळगणा-या एकुण 35 जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली.

• सर्व पोलीस ठाण्यांचे हददीत एकुण 201 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.

1. त्यामध्ये एकुण 7347 वाहनांची तपासणी करण्यात आली.

2. मोटारवाहन कायदयान्वये 1759 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

3. कलम 185 मो.वा.का. अन्वये 75 वाहनचालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह ची कारवाई करण्यात आली.

• बेकायदेशीर वास्तव्य करणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण 815 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.

• अवैध धंदयांवर 43 ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले.त्यामध्ये 69 आरोपींवर कारवाई करण्यात आली.

• प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे एकुण 499 तपासणी करण्यात आले.

• तडिपार केलेल्या एकुण 42 व्यक्तींवर मपोका कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली.

• महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम कलम 120, 122 व 135 अन्वये एकुण 112 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून अनधिकृत 49 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

• अजामीनपात्र वॉरंटमधील एकुण 102 आरोपी अटक करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

Madhavi Latha: "गुन्हे मेडल्ससारखे," बुरखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माधवी लता आणखी काय काय म्हणाल्या

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT