मुंबई

monsoon update: येत्या 48 तासात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नैर्ऋत्य मोसमी वारे गुरूवारी कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाल्यानंतर शुक्रवारी हरणे, बीड, नागपूर, बारामती, वर्धा आणि राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून पुढे राज्यभर मार्गक्रमण करण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून येत्या 48 तासात मान्सून मुंबईसह संपूर्ण राज्य व्यापणार आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये दिवसभर वातावरण ढगाळ होते. संध्याकाळी काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या.

मान्सूनने शुक्रवारी महाराष्ट्रातील आणखी काही भागात हजेरी लावली. सिंधुदूर्ग व मालवणमध्ये चांगला पाऊस झाला. सिंधुदूर्गमध्ये 140 मिमी,  मालवणमध्ये 158 मिमी, संगमेश्वरमध्ये 115 मिमी,  बीड मध्ये 62 मिमी, उदगीरमध्ये 65 मिमी, मुखेडमध्ये 61 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या 48 तासांत मान्सून मुंबईसह संपूर्ण राज्यात दाखल होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
येत्या 48 तासात पालघर, मुंबई, ठाणे येथील काही ठिकाणी  ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडणार असून कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी कुलाबा येथे 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ येथे 32. 4 अंश सेल्सिअस कमाल तापानाची नोंद झाली. कुलाबा येथे 81 टक्के आणि सांताक्रुझ येथे 72 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT