मुंबई

Uran News: न्याय हक्कांसाठी उरणमध्ये शेतकऱ्यांची आक्रमक; हिंद टर्मिनलवर दिली धडक

शेतकऱ्यांचा आक्रोश: वादग्रस्त हिंद टर्मिनल कंपनीवर नोकरी व रोजगाराच्या मागणीसाठी धडक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

Uran News: चिरनेर येथे नव्याने होत असलेल्या हिंद टर्मिनल या लॉजेस्टिक कंपनीत बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना नोकऱ्या व रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी आज चिरनेर व कळंबुसरे येथील सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी या कंपनीवर धडक देवून आपला संताप व्यक्त केला.

चिरनेर हद्दीत हिंद टर्मिनल ही लॉजेस्टीक कंपनी सुमारे 35 एकर जागेत उभी राहत आहे.चिरनेर व कळंबुसरे या दोन गावातील सुमारे 60 शेतकऱ्यांची पिकती जमीन अत्यंत कमी दरात खरेदी करण्यात आली.

त्यावेळी या जागेवर होणाऱ्या प्रकल्पात शेतकऱ्यांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.सध्या या जागेवर हिंद टर्मिनल ही लॉजेस्टिक कंपनी उभी राहत आहे.मात्र कंपनीच्या उभारणीचे काम करणारे कंत्राटदार या कंपनीच्या बाधित शेतकऱ्यांना कोणताही रोजगार देत नाहीत.

त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी आज आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी या कंपनीवर धडक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे.

यावेळी चिरनेर व कळंबुसरे गावातील सुमारे दोनशे शेतकरी सहभागी झाले होते.कंपनीचे काम पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना नक्की नोकरी व रोजगाराच्या संधी मिळतील असे हिंद टर्मिनल कंपनी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कऱ्हाड दौऱ्यावर; विदीप जाधव यांच्याही कुटुंबीयांची भेट घेणार!

मोठी बातमी! शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या अन्‌ शिक्षक भरती ३१ मेपूर्वी; संचमान्यता १० फेब्रुवारीपर्यंत अंतिम; पहिल्यांदा अतिरिक्तचे समायोजन

इयत्ता दहावीत ‘लेखी’त पास होणे झाले सोपे! त्रिभाषा सूत्रांनुसार २५ गुण मिळाले तरी व्हाल उत्तीर्ण; आजपासून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा

Bharat Electronics share : भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरमध्ये वाढीची शक्यता, ५७० रुपयांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राला ९८ हजार कोटी; गेल्या वर्षीच्या तुलनेत १० हजार ३१२ कोटींची वाढ

SCROLL FOR NEXT