मुंबई

मुंबईत गेल्या 24 तासात 2 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर; बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या वाढली

मिलिंद तांबे

मुंबई : बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 20,276 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोव्हिड काळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 1,339 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईत 645 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,863 इतकी आहे. 

मुंबईत आज 2,287 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,25,048 झाली आहे. मुंबईत आज 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,340 वर पोचला आहे. मुंबईत आज 2,347 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 84 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत आज नोंद झालेल्या 47 मृत्यूंपैकी 36 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 10 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 47 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. एकाचे वय 40 वर्षा खालील होते. 14 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 31 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.                 

आज 2,347 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,89,022 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 67 दिवसांवर गेला आहे. तर 8 ऑक्टोबर पर्यंत एकूण 12,32,838  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.05 इतका आहे. 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Marathi News Live Updates: ९० दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सोलापुरात परतीच्या पावसाची हजेरी, पहाटेपासून शहरात पावसाची संततधार

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT