मुंबई

अरे बापरे...राज्यात काही हजार नाही, इतके लाख लोकं क्वारंटाईन... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 29 : राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या देखील वाढत आहे.राज्यात आजपर्यंत 1 लाख 55 हजार 76 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाचा जोर पाहता यात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे अशा 718 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.राज्यात एकूण 1 लाख 55 हजार 76 व्यक्ती क्वारंटाइन आहेत.तर राज्यात एकूण 4785 हजार रिलिफ कँम्प आहेत. त्यात जवळपास 4,97,256  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील 81 हजार गुन्ह्यांची नोंद झाली.तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या 159 घटना घडल्या. त्यात 535 व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  दिली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर  क्वारंटाइन असा शिक्का आहे अशा 618 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 1 लाख 55 हजार 76 व्यक्ती क्वारंटाइन  आहेत. अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.राज्यात  लॉकडाऊनच्या काळात म्हणजे 22 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत  कलम 188 नुसार  81 हजार 63  गुन्हे नोंद झाले असून 16 हजार 548 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.तर विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 85 लाख 50 हजार 394 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो.  लाँकडाऊन च्या काळात  या 100 नंबर वर  प्रचंड भडिमार झाला असून आतापर्यंत 79 हजार 901 फोन आले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1107 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 49,113 वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 3 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 14 पोलीस अधिकारी व 85 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच मुंबईत दोन हॉस्पिटल पोलिसांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले.

more than one lakh fifty five thousand people are in quarantine in maharashtra 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT