dharavi 
मुंबई

मुंबईत झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये सर्वात जास्त मृत्युदर; तब्बल 'इतके' टक्के नागरिक कोरोनाग्रस्त..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्या असलेल्या मुंबईतील प्रभागांमध्ये मृत्यूदर सर्वाधिक आहे.चेंबूर,देवनार,कुर्ला,वांद्रे पुर्व विभागात सर्वाधिक मृत्यूदर असून तेथे झोपडपट्‌टयांमधील लोकसंख्याही 66 टक्‍क्‍यांपासून 84 टक्‍क्‍यां पर्यंत आहे.

महानगर पालिकेने जाहीर केलेल्या 4 जुलैच्या आकडेवारी नुसार मुंबईत आता 82 हजार 814 कोविड रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यातील 52 हजरा 963 जणांनी कोविडवर मात केली आहे.तर,23 हजार 248 रुग्णांवर उपचार सुरु असून 4 हजार 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.संपुर्ण मुंबईचा विचार केल्यास मृत्यूदर 5.54 टक्के आहे.

मुंबईत आता पर्यंत आढळलेले 60 टक्‍क्‍यांहून अधिक कोविड बाधित रुग्ण हे झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या चाळींमध्ये राहाणार आहेत.एम पश्‍चिम चेंबूर प्रभागात मृत्यूदर 8.39 टक्के आहे.हा मुंबईतील सर्वाधिक मृत्यूदर आहे.तर,या प्रभागातील एकूण लोकसंख्ये पैकी 68.48 टक्के नागरीक हे झोपडपट्टीत राहाणार आहेत.

तर,त्या खालोखाल एच पुर्व म्हणजे वांद्रे,सांताक्रुझ,खार पुर्व भागातील 78.79 टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहाणार आहे.येथे मृत्यूदर 8,27 टक्के आहे.त्या खालोखाल देवनार,मानखुर्द या एम पुर्व भागात मृत्यूदर 8.12 टक्के असून येथे झोपडपट्यांमध्ये राहाणारी लोकसंख्या 77.55 टक्के आहे.तर,कुर्ला एल प्रभागात 84.68 टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहाणारी आहे.या भागात मृत्यूदर 8.19 टक्के आहे.

कुलाबा ए प्रभागात मृत्यूदर सर्वात कमी 2.53 टक्के आहे.येथे 28.88 टक्के नागरीक झोपडपट्टीत राहाणार आहेत.त्या खालोखाल कांदिवली आर दक्षिण मध्ये 2.71 मृत्यूदर असून येथे 55 टक्के नागरीक झोपडपट्टीत राहाणार आहेत.मुलूंड टि प्रभागातील 35.21 टक्के नागरीक झोपडपट्टीत राहाणार असून या प्रभागात मृत्यूदर 2.97 टक्के आहे. मुंबईतील दहा प्रभागांमधील मृत्यूदर हा शहरातील सरासरी मृत्यूदरापेक्षा कमी आहे.

more people lost their lives in slums of mumbai due to corona 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT