मुंबई

वडा-पाव, मिसळचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः मुंबईतील दुकाने खुली झाली, पण बिझनेसच नसल्याची तक्रार अनेक दुकानदार करीत आहेत, पण त्याचवेळी खाद्यपदार्थांच्या दुकानांसमोर चांगलीच गर्दी आहे. मिठाई, वडा पाव, फरसाण, पाव भाजी, मिसळची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर चांगलीच गर्दी आहे.

जवळपास तीन महिने रस्त्यावरील चमचमीत पदार्थांपासून मुंबईकर दूर राहिले होते. आता ती कसर भरुन काढली जात आहे. अर्थातच अनेकांना वडा - पाव, मिसळ तसेच मिठाईचा आस्वाद घ्यायचा होता. अर्थातच बहुतेक दुकानदार ग्राहक सुरक्षित अंतराचे पालन करतील याकडे लक्ष देत आहेत तसेच स्वच्छतेस महत्त्व देत आहेत. 

मुंबई तसेच उपनगरातील अनेक खाद्यपदार्थांच्या दुकानात सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात आहेत, त्यामुळे काही दुकानांच्या बाहेर रांगही लागल्याचे चित्र होते. अनेक दुकानदारांनी मागणी वाढत असल्याने दुकानातील स्टॉकही वाढवला आहे. अर्थात त्यांनाही सम - विषम नियमानुसार दुकाने खुली ठेवणे भाग पडत आहे, त्यामुळे काही दुकानदारांनी ताजा स्टॉक उपलब्ध आहे, त्यामुळे आपले दुकान बंद असलेल्या दिवशी ऑर्डर घेऊन घरी माल देण्यास सुरुवात केली आहे. 

रेस्टॉरंट बहुतांश बंदच
रेस्टॉरंट तसेच हॉटेलना खाद्यपदार्थांची विक्री करण्यास परवानगी दिली असली तरी मुंबई परीसरातील दोन टक्केच रेस्टॉरंट तसेच हॉटेल खुली जाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना कामगारांचा प्रश्न जाणवत आहे, त्याचबरोबर अनेकांना येथील खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्याची कल्पनाच रुचत नाही. त्याचबरोबर अनेक गृह सोसायटीमध्ये बाहेरच्या व्यक्तीस अद्यापही प्रवेश नसल्याने होम डिलिव्हरी अशक्यच झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईतील 15 हजार रेस्टॉरंट तसेच हॉटेलपैकी केवळ तीनशे खुली आहेत असे सांगितले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT