corona Media Gallery
मुंबई

मुंबईत आज १७९४ नव्या कोरोना बाधितांची नोंद पण ७४ मृत्यू

रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 163 दिवसांवर आला

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या (corona patient) अधिक असून 1794 नवीन रुग्ण सापडले तर 3580 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आल्याचे दिसते. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 6,78,269 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा कमी झाला नसून आज ही 74 रुग्ण दगावले. मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर कमी होऊन 0.41 टक्क्यांवर खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ही कमी होऊन 163 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai covid situation) नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. (More than one thousand seven hundread new corona patient found)

आतापर्यंत 57,33,431 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 45,534 हजारांवर आला आहे.मुंबईत आज 3580 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,16,998 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

मुंबईत 87 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 493 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 17,041 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 929 करण्यात आले.

धारावीतील स्थिती नियंत्रणात

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत आज 9 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6632 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 4 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9133 झाली आहे. माहीम मध्ये 26 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9339 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 39 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 25,104 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT