Gudhi Padwa swagat yatra sakal media
मुंबई

ठाणे: नववर्ष स्वागत यात्रा यंदा उत्साहात पार पडणार; ७० हून अधिक संस्थांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (corona infection) मराठी नववर्षानिमित्त जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये निघणारी स्वागत यात्रा मागील दोन वर्षे रद्द करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमांवरील ( no restrictions on cultural events) निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळेच गुढीपाडव्यानिमित्त (gudi padva swagatyatra) स्वागतयात्रा काढण्याची उत्साहपूर्ण तयारी आयोजकांकडून सुरू आहे.

ठाणे शहरात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यातर्फे मागील २० वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतराची मुख्य नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. यासोबत जिल्ह्यातील ७ ते ८ शहरांमधील संस्थादेखील आपल्या शहरात उपयात्रा काढत असतात. ठाण्यातील मुख्य यात्रेत दरवर्षी ७० हून अधिक संस्था सहभागी होतात. त्यात ४० ते ५० चित्ररथांचा सहभाग असतो. मराठी नववर्षानिमित्त निघणारी ही स्वागतयात्रा कोपिनेश्वर मंदिरापासून जांभळी नाका, समर्थ मंदिर, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास यामार्गाने जात पुन्हा तलावपाळी येथे संपन्न होत असते.

स्वागतयात्रेची तयारी २ ते ३ महिने आधीपासून सुरू होत असून, यात मराठमोळ्या संस्कृतीतील विविध छटांचे दर्शन नागरिकांना होत असते. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्ष या स्वागतयात्रेला ब्रेक लागला होता. मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन निर्बंध शिथिल झाल्यामुळे कोपिनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्र येथे ७ मार्चला स्वागतयात्रा आयोजनासंबंधित पहिली बैठक पार पडली. त्यानंतर स्वागतयात्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. गुढीपाडव्याचा सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्याने स्वागतयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दर सोमवारी बैठक

पुढील महिन्यात २ एप्रिलला गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्याचे नियोजन आहे. याच पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी कोपिनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्र येथे दर सोमवारी आठ वाजता कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यातर्फे सभा होणार आहे. स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या संस्था-प्रतिनिधींना सभेला हजर राहण्याची विनंती करण्यात आली आहे. स्वागतयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे यंदा नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्याकरीता आम्ही सर्व उत्साही आहोत. यंदा आयोजनासाठी फार कमी वेळ मिळाला असला तरी त्यातूनही मोठ्या कालावधीनंतर होणारी यंदाची स्वागतयात्रा पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वागतयात्रेची पूर्वतयारी आणि नियोजन कसे असावे, याबाबत आम्ही सभा घेत आहोत.

- अत्तम जोशी, अध्यक्ष, श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT