मुंबई

कारागृहांमधील कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा दोन हजारांच्यावर, 1616 कैद्यांनी कोरोनावर मात

अनिश पाटील

मुंबई : राज्यातील कारागृहांमधील कोरोनाबाधीत कैद्यांचा आकडा दोन हजारांच्यावर पोहोचला आहे. तर राज्यातील कारागृहांमधील 1616 कैद्यांनी कोरोनावर मात केली असल्यामुळे कारागृहांमधील कोरोनाचा फैलाव नियंत्रणात असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. कारागृहात मोठ्या प्रमाणत चाचण्या करण्यात आल्यामुळे हा आकडा वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याीतल 43 कारागृहांमध्ये सुमारे 36 हजार कैदी असून त्यातील 14 हजार 252 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 31 मेला कारागृहांमध्ये कोरोना पहिला रुग्ण सापडल्यानंतर या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कारागृहांमध्ये आतापर्यंत 2011 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 6 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. नागपूर कारागृहमध्ये सर्वाधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा सर्वाधिक आहे. पण आर्थर रोड कारागृहातील कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा सध्या नियंत्रणात आला आहे.

आर्थर रोड कारागृहात सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्यभरातील कारागृहांमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2011 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहेत. तर कैद्यांसह जेलमध्ये काम करणारे कर्मचारीही त्यापासून वाचू शकलेले नाहीत. कारागृहात काम करणाऱ्या 416 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

पोलिसांमधील कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 21 हजारांवर : 

राज्य  पोलिसदलातील कोरोना बाधितांचा वाढता आकडाही चिंतेचा विषय ठरलेला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात आतापर्यंत 21 हजार 152 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 17 हजार 295 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच तीन हजार 640 कोरोना बाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे 217 पोलिस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

more than two thousand prisoners are detected corona positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT