skill labor  
मुंबई

MMRDA मध्ये कामगार भरतीला सुरुवात पण अर्जकर्त्यांमध्ये 'या' गोष्टीची कमतरता...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) प्रकल्पाचे काम रखडू नये म्हणून कामगार भरतीला सुरुवात केली आहे. मेट्रोच्या विविध प्रकल्पावरील कंत्राटदारांनी सुरू केलेल्या या भरतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये काम मिळण्याबाबत चौकशी वाढली असली तरी कामगारांमध्ये कौशल्याची कमतरता असल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात येत आहे.
  
एमएमआरडीएने मुंबई आणि महानगर परिसरातील सुरू असलेल्या सर्व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावरील एकूण 11 हजार कामगारांची व्यवस्था कामगार शिबिरांमध्ये केली होती. काम बंद असण्याच्या काळातील भोजन, निवास, वैद्यकीय तपासणी याचा खर्च प्राधिकरणाद्वारेच केला होता. 

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांची कामे 20 एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली, तेव्हा कार्यरत कामगारांची संख्या 16 हजारांपर्यंत गेली होती. मात्र त्याच दरम्यान शहरातील इतर अनेक स्थलातंरित कामगार आपल्या गावी परतू लागले. परिणामी एमएमआरडीएच्या प्रकल्पावरील तीनचतुर्थाश कामगारांनीही परतीची वाट धरली होती. कामगारांच्या तुटवडय़ावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यानी सदर रोजगाराच्या संधी महाराष्ट्रातील कुशल / अकुशल कामगारांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. 

मेट्रोच्या या सर्व प्रकल्पांवर मिळून सुमारे 16 हजार 726 कामगारांची (साडेसात हजार अकुशल आणि साडेआठ हजार कुशल) गरज मांडणारी जाहिरात एमएमआरडीएने नुकतीच प्रकाशित केली. त्यानुसार थेट 16 कंत्राटदारांशीच या कामगारांनी संपर्क साधायचा आहे. या कामगार भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी कंत्राटदार तसेच एमएमआरडीएच्या मदत कक्षात दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र यामध्ये कुशल कामगारांची कमतरता असल्याचे काही कंत्राटदारांनी सांगितले.  

त्याचबरोबर काही कंत्राटदारांनी परत गेलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्यांना मुंबईत परत येण्यास सांगितले असून त्यासदेखील काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असून कामगार परत आल्याचे कंत्राटदारांनी सांगितले. मात्र काही राज्यांतून प्रवासाच्या अडचणी असल्याने त्यांचे येणे रखडत असल्याचे ही  कंत्राटदाराकडून सांगण्यात आले आहे.

more unskilled labors are applying for MMRDA jobs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! थेट BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; राज्यभर कारवायांचा धडाका

Commonwealth Games 2026: जय हो! राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचं पदक पक्कं झालं; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : 'युवकांच्या भविष्यासाठी राजकारण नको; चर्चेत अडथळे आणू नका', सर्व पक्षांना किरेन रिजिजू यांचे आवाहन

Solapur News: मंगळवेढ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध

IND vs ZIM 1st T20I : पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का, फलंदाजाची दुखापतीमुळे माघार, बोर्डाने जाहीर केली रिप्लेसमेंट... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT