मुंबई

नायर रुग्णालयातून आली सर्वात मोठी गोड बातमी, वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

सकाळ ः पालिकेच्या नायर रूग्णालयात सर्वाधिक कोरोना निगेटीव्ह बाळांचा जन्म झाला आहे. नायर रुग्णालयात जन्म घेतलेल्या तब्बल 412 नवजात बालकांनी आई कोरोना पॉझिटिव्ह असुन ही कोरोनावर मात केली आहे. 

नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 408 कोरोना पॉझिटिव्ह मातांनी 412 बाळांना जन्म दिला. या मातांनी जन्म दिलेल्या बाळांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी 370 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ही रुग्णालयातून देण्यात आली आहे. 

14 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 408 कोरोना पॉझिटिव्ह माता नायर रुग्णालयात वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी काहींची प्रसूती झाली असुन काही उपचार घेत आहेत. नायर रुग्णालयातच काही दिवसांपूर्वी 200 कोरोना निगेटीव्ह बाळांनी जन्म घेतला होता. मात्र, आता ही संख्या वाढली असून ती 412 वर पोहोचली आहे. 

मातांनी बाळांना जन्म दिल्यानंतर या बाळांची कोरोना चाचणी केली गेली. मात्र, या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असुन ही एक दिलासादायक बाब नायर रुग्णालयाच्या बालरोगतद्य डॉ. सुषमा मलिक यांनी दिली आहे. 

आतापर्यंत वयोवृद्ध, गर्भवती महिला , दिर्घ आजार असणार्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नायर रुग्णालयात जन्म घेतलेली बालके कोरोना निगेटीव्ह आल्याने डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयात एवढ्या कोरोना निगेटीव्ह बाळांचा जन्म झाला नसल्याचा दावा ही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार, नायर रुग्णालयात जगातील इतर रुग्णालयांपेक्षा सर्वाधिक निगेटीव्ह बाळांचा जन्म झाला आहे

408 मातांनी 412 बाळांना जन्म दिला. त्यात सात जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली. त्यात आधी 15 बालके कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यांची सर्वांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात ती बालके कोरोना निगेटीव्ह आली. मात्र, त्या बाळांना हाताळल्यानंतर बालकांना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार केले गेले. आणि ती सर्व बालके डिस्चार्ज देण्याआधी निगेटीव्ह आली आहेत. मातेने बाळाला हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. बाळ आधी निगेटीव्ह आले तरी ते हाताळण्यातून पॉझिटिव्ह येऊ शकते. गर्भात किंवा दुध प्यायल्यानंतर बाळाला संसर्ग होत नाही.

डॉ. सुषमा मलिक, बालरोगतद्य, नायर रुग्णालय

संपुर्ण खबरदारी आणि काळजी घेऊनच या मातांची प्रसूती केली गेली आहे. जन्माला आलेल्या बाळांपैकी एकूण 307 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह मातेची प्रसूती करणं हे खुप कठीण कार्य असतं. ज्यात सर्वाधिक यश हे निवासी डॉक्टरांचे आहे. आतापर्यंत रुग्णालयात सर्वाधिक बाळांनी जन्म घेतला आहे. 

डॉ. नीरज महाजन, नोडल अधिकारी, कोविड 19, नायर रुग्णालय प्रसूती विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT