Viral Video Sakal
मुंबई

Video Viral : मम्मी.. मम्मी.. म्हणत राहिले लेकरं अन् डोळ्यादेखत आई गेली लाटेत वाहून; हृदय पिळवटणारी घटना

पालकांना का कळत नाही? निष्काळजीपणाने आईचा बळी गेला पण लेकरं झाली पोरकी

दत्ता लवांडे

मुंंबई : पावसाळ्यात पर्यटकांनी फिरायला जाताना निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकांची जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कधीकधी निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो हे सर्वांना माहिती असूनही अनेकजणांना कळत नाही आणि नाहकपणे आपला जीव गमावून बसतात. सध्या मुंबईतील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना मुंबईतील बांद्रा बँडस्टँड येथे घडली आहे. गौतमनगर येथील रहिवाशी असलेले मुकेश सोनार (३५) आणि त्यांची पत्नी ज्योती सोनार (३२) असं या दाम्पत्याचं नाव असून ज्योती यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर मुकेश हा एका खासगी कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. या घटनेतून इतरांनी बोध घ्यावा आणि सोशल मीडियामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्याचे अवाहन केले आहे असं वृत्त मिड-डे या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

दरम्यान, हे कुटुंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असताना मुकेश आणि ज्योती समुद्रातील दगडावर फोटो काढण्यासाठी थांबलेले दिसत आहे. तर दोन ते तीन लाटा येईपर्यंत ते त्याच दगडावर बसलेले आहेत. पाठीमागे त्यांच्या लहान लहान मुलांचा आवाज ऐकायला येत आहे.

दरम्यान, काही क्षणात एक मोठी लाट येते आणि त्यामध्ये ते दोघेही वाहून जातात. पण मुकेश स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी होतो आणि ज्योती लाटेत वाहून जाते. ती वाहून गेल्यानंतर त्यांची लेकरं मम्मी... मम्मी... म्हणत आर्तपणे हाक मारत आहेत. लेकरांचा आवाज ऐकून हृदय पिळवटून निघते. "तर यांना बऱ्याच वेळापासून म्हणतोय वर या वर या तर ऐकलं नाही" असं एक व्यक्ती बोलत आहे.

सदर जोडप्याच्या निष्काळजीपणामुळे दोन लेकरं पोरकी झाले आहेत. पालकांनी अशा धोकादायक ठिकाणी फिरायला जाताना काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाठीमागे परिवारात लहान मुले आहेत याची किमान जाणीव ठेवायला पाहिजे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT