मुंबई

पाच वर्षांच्या मुलीला मेणबत्तीचे चटके 

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - कळंबोली सेक्‍टर-14 मधील महिलेने पोटच्या पाच वर्षांच्या मुलीला मेणबत्तीचे चटके देऊन तिचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या घटनेतील मुलीच्या चुलतीनेही चटके देताना तिचे हात पकडल्याचे उघडकीस आले आहे. यात मुलीच्या सर्वांगावर चटके दिल्यामुळे भाजल्याच्या जखमा आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी मुलीच्या आईसह तिच्या चुलतीलाही अटक केली आहे. 

साक्षी यादव असे मुलीचे नाव असून ती आई-वडील व भावंडासह कळंबोलीतील रोडपाली येथील विनायक सोसायटीत राहते. तिचे वडील घनश्‍याम व भाऊ धनंजय भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. या दोघा भावांची पाच लहान मुले आहेत. या सगळ्यांमध्ये साक्षी मोठी असल्याने व ती जास्त मस्ती करत असल्याने आई व चुलती तिला चटके देत होत्या. मंगळवारी दुपारीही अनिताने साक्षीला बेदम मारहाण करून मेणबत्तीचे चटके दिले. या वेळी साक्षीची चुलती रिंकीने तिचे हात पकडून ठेवले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दोघींना अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT