६६ मांजरींची माय Sakal
मुंबई

६६ मांजरींची माय

मालवणी येथे एका भाड्याने घेतलेल्या घरात सेला बोस ६६ मांजरींचा सांभाळ करत आहेत.

निसार अली : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मालवणी येथे एका भाड्याने घेतलेल्या घरात सेला बोस ६६ मांजरींचा सांभाळ करत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनाने जगभरात मोठ्या उलथापालथी घडवून आणल्या. अनेकांचे व्यवसाय-धंदे बुडाले तर कित्येकांचे रोजगार गेले. जगणेच कठीण झाल्याने मध्यमवर्गात असणारे अनेक जण गरिबीत ढकलेले गेले. त्यामुळे एकेकाळी लाडाने पाळलेल्या मांजरीही अनेकांनी रस्त्यावर सोडून दिल्या; मात्र मुंबईतील सेला बोस यांनी अशा ६६ मांजरांना निवारा देऊ केला आहे.

मालवणी गेट क्रमांक ३ येथे राहणाऱ्या सेला बोस यांना २१ नोव्हेंबर २०२० रोजी एक मांजर रस्त्यावर आढळले होते. लहान भावाच्या मदतीने त्यांनी ती मांजर घरी आणली. त्यानंतर अशा रस्त्यावर आढळणाऱ्या मांजरी त्यांनी घरी आणण्यास सुरुवात केली. नंतर मांजरींची संख्या वाढल्याने त्यांनी चक्क एक खोली भाड्याने घेतली. विशेष म्हणजे सेला बोस या स्वत: भाड्याच्या घरात राहतात. तरीही या मांजरींचा खाण्यापिण्यापासून सर्व खर्च त्या स्वत: करतात. मांजरींची देखभाल करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीलाही कामावर ठेवले आहे. पैशांची चणचण भासली तरी काही वेळा मैत्रिणींकडूनही त्यांना मदत केली जाते; तर कधी यासाठी त्यांना कर्जही काढावे लागते. अनेक वेळा या सोडलेल्या मांजरी जखमी असतात. अशा काही मांजरींना त्यांनी उपचार करून वाचवले आहे. सुरुवातीला हौस म्हणून प्राण्यांचा सांभाळ करण्याचे सुरू केलेले काम आता त्यांचे कर्तव्य बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Meat Incident: दारूच्या नशेसाठी माणुसकी संपली! कुत्र्याला मारलं अन् ‘सशाचं मांस’ म्हणून विकलं... गावात घडलं भयानक कृत्य

Latest Marathi News Live Update : काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

साक्षीसोबत रोमान्स करताना सचिनला रंगेहात पकडणार अर्जुन; बहिणीच्या नवऱ्याचे कारनामे पाहून होणार रागाने लाल

हृतिक रोशनचा मुलांसोबत भन्नाट डान्स, वडिलांसारखी पोरं पण काही कमी नाही, व्हिडिओ व्हायरल

Karad Accident: डंपरच्या धडकेमध्ये सैदापूरला निवृत्त शिक्षक ठार; पत्नी गंभीर जखमी, पाठी मागून जाेराची धडक!

SCROLL FOR NEXT