Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut  
मुंबई

Sanjay Raut : पीएम मोदी, सरन्यायाधीश अन् गणपतीचे मोदक...15 दिवसांची कैद झाल्यानंतर काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut 15 days jail term after defamation case against Shiv Sena leader : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना माझगाव कोर्टाकडून १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे

रोहित कणसे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना माझगाव कोर्टाकडून १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीची बदनामी केल्याप्रकरणात हा निकाल देण्यात आला आहे. दरम्यान या शिक्षेवर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

राऊतांची पहिली प्रतिक्रिया

ज्या देशाच्या मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला जातात, तेथे भ्रष्टाचार आणि इतर काही गोष्टींबद्दल प्रश्न विचारणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना न्याय कुठून मिळेल. हे अपेक्षित होते. तरी मी न्यायालयाचा आदर करतो.... मीरा भाईंदर भागात युवक प्रतिष्ठानकडून काही कामे झाली होती, यामध्ये गडबड झाली आहे असे मी म्हटलं नव्हतं. याबद्दल मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. त्यावर तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनी भ्रष्टाचार झाला असून चौकशी झाली पाहिजे असे म्हटलं. यानंतर त्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी विधानसभेत चर्चा झाली आणि एक आदेश पारीत झाला. ही गोष्ट मी बोललो तर माझ्याकडून मानहाणी कशी झाली? सगळं ऑन रेकॉर्ड आहे असे संजय राऊत म्हणाले.

मीरा भाईंदर नगरपालिकेचा रिपोर्ट देखील आहे. काहीतरी गडबड, भ्रष्टाचार आहे असे मी फक्त प्रश्न विचारले. मी काही कागद कोर्टासमोर सादर केले. पण संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे. तरी आम्ही न्याय व्यवस्थेचा आदर करतो. आम्ही पुढील कोर्टात अपील करणार आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

नेमकं प्रकरण काय आहे?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नते संजय राऊत यांना १५ दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा कारावासाची आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मीरा-भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणी २०२२ मध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांशी संबंधीत संस्थेने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते. यानंतर मेधा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. तो दावा आता निकाली निघाला असून, त्यानंतर राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT