file photo 
मुंबई

एमआरआयडीसी बांधणार 10 पूल 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवरील 10 उड्डाणपुलांची बांधणी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) करणार आहे. त्यासाठी रेल्वे व मुंबई महापालिकेकडून निधी दिला जाईल. लोअर परळ येथील पुलाचा काही भाग आणि माटुंगा येथे रेल्वेमार्गाखालील पुलाची बांधणीही एमआरआयडीसी करणार आहे.

महत्‍वाचे...गडकिल्‍ल्‍यांवर दारू पिणार्‍यांवर कठोर कारवाई करा
रेल्वेच्या हद्दीतील पादचारी पूल आणि भुयारी मार्गांचे काम करताना महापालिका आणि रेल्वेला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी झटकण्याचे प्रकारही सुरू होतात. त्यामुळे नवे पूल बांधणे व सध्याच्या पुलांच्या डागडुजीची कामे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला (एमआरआयडीसीएल) देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागातील 69 पुलांची कामे सुरू आहेत.

राज्य सरकार व रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या या संस्थेमार्फत राज्यातील विविध प्रकल्पांच्या कामांची अंमलबजावणी केली जाते. या संस्थेला पूल बांधण्याचे काम दिल्यास रेल्वे व महापालिका यांच्यात योग्य समन्वय साधला जाणार आहे. या पुलाच्या बांधणीसाठी येणारा खर्च 60 टक्के आणि 40 टक्के असा विभागला जाईल. एका पुलासाठी 50 ते 100 कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. 

टयुब्युलर डिझाईन 
पूल गंजू नयेत म्हणून नव्या डिझाईनमध्ये ट्युब्युलर डिझाईनचा वापर करण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन पूल अजूनही मजबूत असले, तरी 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या पुलांची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. ते पूल नव्याने बांधताना त्यांच्यावर पाणी थांबणार नाही असा आराखडा तयार करण्यात येईल. पुलांच्या बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवीन पुलांचे बांधकाम झाल्यानंतरच जुने पूल तोडले जातील, असे एमआरआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या उड्डाणपुलांची उभारणी 
भायखळा, ऑलिव्हंट, महालक्ष्मी, आर्थर रोड, घाटकोपर, लोअर परळ, बेलासिस रोड, गार्डन (एस) ब्रिज, टिळक पूल, रे रोड, करी रोड, आणि हार्बरवरील माटुंगा येथे रेल्वेमार्गाखालील पूल. 

मुंबईत रेल्वेचे 10 उड्डाणपूल नव्याने बांधण्यात येतील. वाहतूक कोंडी किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी नवीन पूल उभारल्यानंतरच जुने पूल तोडण्याचा प्रयत्न राहील. 
- राजेश जयस्वाल, व्यवस्थापकीय संचालक, एमआरआयडीसी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT